घरक्रीडाCSK सात वेळा IPL फायनलमध्ये ही आहेत सहा कारणे

CSK सात वेळा IPL फायनलमध्ये ही आहेत सहा कारणे

Subscribe

 

व्हिसल पोडू करत नऊ पैकी सात वेळा चेन्नई सुपर किंग्जने आयपीएलच्या फायनलमध्ये जाण्याची किमया साधली आहे. स्पॉट फिक्सिंगच्या आरोपामुळे आयपीएलचे दोन सीझन सीएसकेला स्पर्धेबाहेर राहावे लागले होते. मात्र यावर्षी सीएसकेने दमदार कमबॅक केले आहे. याआधी २००८, २०१२, २०१३, २०१५, २०१०, २०११ आणि यावर्षी सीएसकेने फायनल मध्ये धडक दिली आहे. पैकी २०१० आणि २०११ साली बॅक टू बॅक आयपीएलच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले होते. चेन्नईच्या सातत्यपूर्ण यशामागील ही आहेत काही कारणे…

- Advertisement -

६. टीममधील एकी

सीएसके मागील दोन वर्षे आयपीएल मध्ये नसली तरी यावर्षी येऊन पुन्हा आपला दमदार खेळ दाखवत सीएसके फायनल पर्यंत पोहचली आहे. यात एक कारण हेही आहे ते म्हणजे टीमची एकी धोनीची कप्तानी आणि त्याला मिळालेली प्लेअर्सची उत्तम साथ… ज्यामुळे सीएसके दरवर्षी उत्तम खेळ दाखवताना दिसून येते.

५. बॉलर्सचा भेदक मारा

सीएसके दरवर्षी आपल्या बॉलिंगने सर्व टीमच्या बॅटस्मनना पळता भुई थोडी करतात. सीएसकेकडे सर्व प्रकारचे बॉलर्स आहेत ज्यात स्पिनर, पेस, डेथ बॉलर्सचा समावेश आहे. यावर्षी दीपक चहर, शार्दूल ठाकूर या नव्या बॉलर्सने उत्तम कामगिरी केली. त्यांना साथ देत ब्राव्हो, वॉटसन, हरभजन यांनीही उत्तम बॉलिंग करत सीएसकेला फायनल्स पर्यंत पाठवले.

- Advertisement -

४. टाईट फिल्डिंग

सीएसकेमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्तम फिल्डर्स असल्याने त्यांची फिल्डिंग नेहमीच टाईट असते. ज्यामध्ये ब्राव्हो, जडेजा, वॉटसन, रैना यांचा समावेश आहे. इतरही …. त्यांच्या उत्तम फिल्डिंगने समोरच्या टीमला जास्त रन करणे शक्य होत नाही.

३. बॅट्समनचे सातत्य

सीएसकेचे जास्तीत जास्त बॅट्समन हे सातत्याने उत्तम खेळताना दिसतात. ओपनर्स सीएसकेला भक्कम सुरुवात करुन देत आहेत. या सीझनमध्ये रायडू चांगली ओपनिंग करतोय. त्याच्या जोडीला वॉट्सनही उत्तम खेळतोय. मधल्या फळीतील धोनी, रैना, ब्राव्हो यांचीही चांगली भागीदारी होताना दिसत आहे. शिवाय तळातील दीपक चहर, हरभजन, शार्दूल हे देखील मोठे फटके मारायची क्षमता बाळगून आहेत.

२. जास्तीत जास्त ऑलराउंडर्स

सीएसकेचा स्ट्राँग पॉईंट म्हणजे त्यांच्याकडे असणारे जास्तीत जास्त ऑलराउंडर्स… या टीममध्ये सर्वात जास्त ऑलराउंडर्स खेळताना दिसतात ज्यात प्रामुख्याने ब्राव्हो, वॉटसन, जडेजा, दिपक चहर आणि अगदी क्वालिफायर वनमध्ये चमकलेला शार्दूल ठाकूर यांचा समावेश आहे. यावर्षीदेखील ब्राव्होची कामगिरी इतकी उत्तम होती की प्रत्येक खेळात त्याची ऑलराउंडर कामगिरी आपल्याला दिसून आली.

१. धोनीची कूल कप्तानी

सीएसकेच्या जिंकण्यामागील सर्वात भक्कम कारण आहे धोनीची कप्तानी. धोनी आपल्या उत्तम निर्णयामुळे सीएसकेला फायनलपर्यंत नेतो. योग्य वेळी घेतलेले योग्य निर्णय ज्यामुळे सीएसके अवघड परिस्थितही मॅच जिंकते.

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -