सेहवागने नाकारली भाजपकडून लोकसभा लढवण्याची ऑफ

गेल्या अनेक दिवसांपासून भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग लोकसभा लढवणार असल्याच्या चर्चांना अखेर पूर्ण विराम मिळाला आहे.

Delhi
virendra sehwag
वीरेंद्र सेहवाग

भारताचा माजी सलामीवीर आणि धडाकेबाज फलंदाज म्हणून ओळख असलेला वीरेंद्र सेहवाग लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होती. मात्र भाजपने दिलेली लोकसभा लढवण्याची ऑफर त्याने नाकारली आहे. त्यामुळे आता या चर्चांना पूर्ण विराम मिळाला आहे. विरेंद्र सेहवागला भाजपच्या तिकीटावर लोकसभा लढवण्याची संधी होती. विरेंद्र सेहवाग पश्चिम दिल्लीच्या लोकसभा मतदार संघातून भाजपच्या तिकीटावर लोकसभा लढवणार असल्याचे बोलले जात होते. मात्र सेहवागने भाजपचे तिकीट नाकारले आहे. त्याने काही वैयक्तीक कारणांसाठी भाजपकडून लढण्यास नकार दिल्याचे सांगीतले जात आहे. दिल्लीतील भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने याबद्दल माहिती दिली आहे.

काय म्हणाला सेहवाग

लोकसभेच्या सात जागा असलेल्या दिल्लीमध्ये १२ मे रोजी मतदान होणार आहे. पश्चिम दिल्ली लोकसभा मतदार संघासाठी भाजपकडून विरेंद्र सेहवागच नाव पुढे येत होत. मात्र सेहवागने भाजपची उमेदवारी नाकारताना सध्या राजकारणात येण्यासाठी तो इच्छित नसल्याते सांगीतले आहे. राजकारण आणि निवडणूक लढवण्यास सध्यातरी स्वारस्य नसल्याचे सेहवागने म्हटले आहे. त्यामुळे सेहवाग लोकसभा लढवण्याच्या चर्चांना आता पर्णविराम मिळाला आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेमुळे भाजपने दिल्ली लोकसभेच्या सातच्या सात जागा जिंकल्या होत्या. मात्र आता मोदी लाट ओसरली असून, भाजप सेलिब्रिटींना निवडणुकीच्या रिंगणात उतरवत आहे. सेहवागने माघार घेतल्या नंतर भाजप आता या जागेसाठी कोणता उमेदवार रिंगणात उतरवणार ते अद्यापतरी अस्पष्ट आहे.

सेहवागचे मतदारांना अवाहन

दरम्यान, अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग, अनिल कुंबळे, वी.वी.एस.लक्ष्मण, यांना मतदारांना मतदानासाठी अवाहन करण्याचे अपील केले होते. त्यावर ट्विट करताना मतदान करण आपला अधिकार अणि कर्तव्य असून सर्वांनी मतदान करा असे आवाहन मतदारांना केले आहे.

 

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here