घरक्रीडाशाहीद आफ्रिदीचा भारतीय प्रसारमाध्यमांवर आरोप!

शाहीद आफ्रिदीचा भारतीय प्रसारमाध्यमांवर आरोप!

Subscribe

शाहीदने त्याच्या ट्वीटर अकाउंटवरुनही भारतीय प्रसारमाध्यमांवर आरोप करणारं एक ट्वीट केलं आहे.

माजी पाकिस्तानी क्रिकेटर शाहीद आफ्रिदीने भारतीय प्रसारमाध्यंमांवर आरोप केला. ‘जो मी मुळात नाहीये तो दाखवण्याचा प्रयत्न भारतातील प्रसारमाध्यमांकडून केला जातो. माझी विधानं ते त्यांच्या सोयीनुसार एडिट करून आणि जोडून दाखवतात आणि मला बदनाम करतात’, असा आरोप शाहीदने यावेळी केला. हिंदुस्तानी प्रसारमाध्यमांवर लावलेल्या या आरोपामुळे शाहीद आफ्रिदी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शाहीदने त्याच्या ट्वीटर अकाउंटवरुनही भारतीय प्रसारमाध्यमांवर आरोप करणारं एक ट्वीट केलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावरुनही त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने लंडनच्या एका पत्रकार परिषदेमध्ये बोलतेवेळी ‘पाकिस्तान स्वत:च्या देशातील चार प्रांत सांभाळू शकत नाही, तर काश्मीर काय सांभाळणार’ असं विधान केलं होतं. ज्यामुळे तो सोशल मीडियावर ट्रोलिंगचा शिकार झाला होता. दरम्यान, याविशयी ट्वीट करत त्याने म्हटलं की, ‘भारतीय प्रसारमाध्यमांनी माझ्या संभाषणाची क्लिप अर्धवट दाखवली. मला माझ्या देशाचा आणि कश्मीर लढ्याचा अभिमान आहे. किमान माणुसकीच्या नात्याने त्यांना त्यांचा अधिकार मिळाला पाहिजे’. याआधीही शाहीद आफ्रिदी अनेकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आला आहे. मात्र, यावेळी त्याने थेट भारतीय माध्यमांशीच पंगा घेतल्याचं दिसतंय.


पाकिस्तान काश्मीर काय सांभाळणार? 

काही दिवसांपूर्वीच शाहीद आफ्रिदीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यामध्ये आफ्रिदी स्पष्टपणे म्हणाला होता की, ‘काश्मीरला सांभाळणं पाकिस्तानच्या अवाक्याबाहेर आहे. पाकिस्तानकडून देशातील नागरिकांचाच सांभाळ होत नाही. मग पाकिस्तान काश्मीरला कसे सांभाळू शकेल?’. यापुढे तो म्हणतो की, काश्मीर कुणालाच देऊ नका. न भारताला काश्मीर देऊ आणि न पाकिस्तानला. शिवाय, पाकिस्तान स्वत:च्या देशातील नागरीकांचा सांभाळ करु शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार? त्यामुळे काश्मीरला इशू नका बनवू. काश्मीरला विभक्त असा देश बनवा. जेणेकरुन तिथले नागरिक सुखाने राहू शकतील, मग ते कुठल्याही धर्माचे असूदेत. काश्मीरमध्ये माणूसकी जिवंत राहणे फार गरजेचे आहे, असेही आफ्रिदी म्हणाला.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -