घरक्रीडाशशांक मनोहर यांच्यामुळे भारतीय क्रिकेटचे नुकसान झाले - श्रीनिवासन

शशांक मनोहर यांच्यामुळे भारतीय क्रिकेटचे नुकसान झाले – श्रीनिवासन

Subscribe

शशांक मनोहर यांच्यामुळे भारतीय क्रिकेट आणि बीसीसीआयचे खूप नुकसान झाले आहे अशी टीका बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन श्रीनिवासन यांनी केली.

शशांक मनोहर बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) अध्यक्षपदावरून पायउतार झाले. ते नोव्हेंबर २०१५ पासून आयसीसीचे अध्यक्षपद भूषवत होते. मनोहर यांनी आयसीसीचे अध्यक्षपद सोडणे हे भारताच्या आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) दृष्टीने आनंदाची बाब आहे, असे बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन श्रीनिवासन म्हणाले. तसेच मनोहर यांच्यामुळे भारतीय क्रिकेट आणि बीसीसीआयचे खूप नुकसान झाले आहे अशी टीकाही श्रीनिवासन यांनी केली.

प्रत्येक निर्णय भारतीय क्रिकेटच्या विरोधात

शशांक मनोहर यांच्यामुळे भारतीय क्रिकेटचे खूप नुकसान झाले आहे आणि त्यांनी आयसीसीचे अध्यक्षपद सोडल्यामुळे भारतीय क्रिकेटमध्ये कार्यरत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला आनंद झाला असेल. त्यांच्या धोरणांमुळे भारतीय क्रिकेटचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यांचा प्रत्येक निर्णय हा भारतीय क्रिकेटच्या विरोधातच होता आणि त्यामुळे जागतिक क्रिकेटमध्ये भारताचे महत्त्व कमी झाले आहे. आयसीसीमध्ये जे अधिकारी भारताचे प्रतिनिधित्व करतात, ते मनोहर यांना पाठिंबा देणार नाहीत. हे मनोहर यांनाही ठाऊक होते. त्यामुळेच त्यांनी आयसीसीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, असे श्रीनिवासन एका मुलाखतीत म्हणाले.

- Advertisement -

महामारीच्या वेळी आयसीसीच्या अध्यक्षपदावरून पायउतार

शशांक मनोहर हे कधीही अवघड परिस्थितीचा सामना करत नाहीत. २०१५ मध्ये बीसीसीआय अडचणीत असताना त्यांनी बीसीसीआयचे अध्यक्षपद सोडले. आता महामारीच्या वेळी ते आयसीसीच्या अध्यक्षपदावरून पायउतार झाले आहेत. त्यांच्यासारखा व्यक्ती आता आयसीसीचा भाग नसेल याचा मला आनंद आहे, असेही श्रीनिवासन म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -