घरक्रीडाआम्हाला पर्याय कायम आवडतात

आम्हाला पर्याय कायम आवडतात

Subscribe

राहुलबाबत शास्त्रींची प्रतिक्रिया

महेंद्रसिंग धोनीने घेतलेल्या मोठ्या ब्रेकनंतर भारतीय संघात यष्टीरक्षक म्हणून ऋषभ पंतची वर्णी लागली.परंतु, पंत हा पहिल्या सामन्यात फलंदाजीच्या वेळी दुखापतग्रस्त झाला. त्याच्या जागी पहिल्या सामन्यात लोकेश राहुल याने यष्टीरक्षणाचा भार सांभाळला. त्यानंतरही पंत तंदुरुस्त न झाल्याने दुसर्‍या सामन्याआधी बॅक-अप किपर म्हणून संघात केएल राहुल याला स्थान देण्यात आले होते. पण लोकेश राहुलने संपूर्ण मालिकेत यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळली. त्याबाबत रवि शास्त्री यांनी झकास उत्तर दिले आहे. आम्हाला पर्याय कायम आवडतात, अशी मिश्किल प्रतिक्रिया शास्त्रींनी दिली आहे.

तसेच शिखर धवनबद्दल बोलताना शिखर धवन दुखापतग्रस्त झाला हे खूपच दुर्दैवी आहे. कारण धवन हा अतिशय अनुभवी आणि ज्येष्ठ खेळाडू आहे. त्याच्याकडे एकहाती सामना जिंकवून देण्याचे कौशल्य आहे. अशा एखाद्या महत्त्वाच्या खेळाडूला दुखापत झाली तर संघातील सारेच खेळाडू हळहळतात, असे शास्त्रींनी सांगितले. न्यूझीलंड दौर्‍यासाठीच्या भारतीय संघात शिखर धवन याला संघात स्थान देण्यात आले होते, पण त्याला दौर्‍यातून माघार घ्यावी लागली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -