घरक्रीडारितेश भडांगेने पटकावला शौकत श्रीचा किताब

रितेश भडांगेने पटकावला शौकत श्रीचा किताब

Subscribe

इंडियन बॉडीबिल्डर्स फेडरेशन व महाराष्ट्र बॉडीबिल्डींग असोसिएशनने नाशिक जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटनेच्या मान्यतेने आयोजित शौकत श्री २०२० चा मानाचा किताब इगतपुरच्या रितेश भडांगेने पटकावला. शौकत व्यायाम मंडळ आणि नॅशनल स्पोर्ट्स अँड सप्लिमेंट मनमाडने आयोजित केलेल्या या स्पर्धेत बेस्ट पोझरचा मान मनमाडच्या वसीम शेखला मिळाला.

सहा वजनी गटांमध्ये झालेल्या या स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील एकूण ८७ शरीरसौष्ठवपटूंनी सहभाग घेतला होता. मनमाड, मालेगाव, घोटी इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, वणी दिंडोरी, सिन्नर, लासलगाव, येवला, चांदवड यांसारख्या ग्रामीण भागातील शरीरसौष्ठवपटूंची संख्या लक्षणीय ठरली. प्रत्येक वजनी गटात अव्वल पाच खेळाडूंना रोख रकमेचे पारितोषिक मिळाले. तसेच त्यांना एक किलो सप्लिमेंट आणि प्रमाणपत्रही प्रदान करण्यात आले.

- Advertisement -

या स्पर्धेचे उद्घाटन पंकज खताळ, इरफान मोमिन यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी गोपाळ गायकवाड, शाबीरभैय्या शाह, अन्सार शाह, आशिष पोहाल, नविद शाह, अर्जुन जावळे, निलेश भमणे, संजय सोनासे आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेचे पंच म्हणून गोपाळ गायकवाड, श्रीराम जाधव, राहुल पंडित, संकेत घोडके, अमोल जाधव, अमन शेख यांनी काम केले.

स्पर्धेचे निकाल –

५५ किलो : १) कृष्णा पिंगळे, २) गणेश आंबेकर, ३) सुनिल माळी
६० किलो : १) मंगेश नांगरे, २) रामचंद्र पोटींदे, ३) गोपीनाथ भोये
६५ किलो : १) संतोष तोकडे, २) दीपक जगताप, ३) सुबोध जगताप
७० किलो : १) मयुर शिंदे, २) नागेश दरगुडे, ३) ऋषिकेश गांगुर्डे
७५ किलो : १) रितेश भडांगे, २) राकेश देवरे, ३) नविद शाह
८० किलो : १) आकाश झाकणे, २) वसीम शेख, ३) गोपीनाथ रोडे

- Advertisement -

शौकत श्री : रितेश भडांगे, इगतपुरी
बेस्ट पोझर : वसीम शेख, मनमाड
मोस्ट इम्प्रुव्हड बिल्डर : संतोष तोकडे, इगतपुरी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -