घरक्रीडाशिखर धवन विश्वचषकातून बाहेर; 'या' खेळाडूला संधी

शिखर धवन विश्वचषकातून बाहेर; ‘या’ खेळाडूला संधी

Subscribe

भारताचा सलामीचा फलंदाज शिखर धवनला दुखापतीतून सावरण्यासाठी महिन्याभराचा कालावधी लागणार असल्याने त्याला विश्वचषक २०१९ साठी संघातून वगळण्यात आले आहे.

विश्वचषक २०१९ मध्ये टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. कारण टीम इंडियाचा सलामीचा फलंदाज शिखर धवन विश्वचषक २०१९ या संपूर्ण स्पर्धेतून बाहेर झाला आहे. ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या मॅचवेळी शिखर धवनच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. या दुखापतीतून बाहेर पडण्यासाठी शिखरला जवळपास महिन्याभराचा अवधी लागणार असल्याने त्याला टीम इंडियामधून वगळण्यात आले आहे.

दरम्यान शिखर धवन जखमी होताच, ऋषभ पंतला इंग्लंडमध्ये पर्याय म्हणून पाठवण्यात आले होते. आयसीसीची परवानगी मिळाल्यानंतर ऋषभ पंतचा टीममध्ये समावेशाचा मार्ग मोकळा होईल.

- Advertisement -

ऋषभ पंतचा टीममध्ये समावेश

शिखर धवनच्या अंगठ्याची दुखापत १०-१२ दिवसात बरी होईल, असा टीम इंडियाला अंदाज होता. मात्र धवनची दुखापत बरी होण्यासाठी महिन्याभराचा कालावधी लागणार आहे. यापूर्वी शिखर धवनऐवजी बदली खेळाडूची मागणी टीम इंडियाकडून करण्यात आली नव्हती. मात्र शिखर धवनला दुखापतीतून बाहेर पडण्यास अवधी लागणार असल्याने त्याच्याऐवजी संघात ऋषभ पंतचा समावेश करण्याबाबत बीसीसीआय आयसीसीकडे परवानगी देण्याची मागणी करणार आहे.

टीम इंडियाचा पुढील सामना अफगाणिस्तानबरोबर

विश्वचषकामध्ये टीम इंडियाचा पुढील सामना २२ जून रोजी अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. या सामन्यात ऋषभ पंतला संधी मिळते का हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -