घरक्रीडाशिखरचे ट्विटर हॅक झाले आणि

शिखरचे ट्विटर हॅक झाले आणि

Subscribe

भारताचा सलामीवीर शिखर धवन सध्या आशिया चषकात अप्रतिम प्रदर्शन करत आहे. पण मैदानाबाहेर त्याला अडचणीला सामोरे जावे लागत आहे.

भारताचा सलामीवीर शिखर धवन सध्या मैदानात आपला जळवा दाखवतो आहे. पण मैदानाबाहेर चित्र जरा वेगळे आहे. शिखर धवनचे ट्विटर हॅक झाले होते. त्यामुळे त्याला काही अडचणींचा सामना करावा लागला.

अनेकांना चित्रविचित्र संदेश पाठवले गेले 

शिखर धवनने पाकिस्तानविरुद्ध अप्रतिम प्रदर्शन केले. ‘सुपर ४’च्या सामन्यात शिखरने ११४ धावांची खेळी केली. त्यामुळे भारताने आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला. पण या सामन्यापूर्वी मैदानाबाहेर त्याला अडचणीला सामोरे जावे लागले. शिखरचे ट्विटर हॅक झाले होते. शिखरचे ट्विटर हॅक झाल्याने त्याच्या ट्विटरवरून अनेकांना चित्रविचित्र संदेश पाठवले गेले. त्यामुळे शिखराला संदेश पाठवून हे सांगावे लागले की ‘माझे ट्विटर हॅक झाले असल्याने त्यावरून कोणताही संदेश आला तर त्याकडे दुर्लक्ष करावे.’

रशीद खानला गेला होता संदेश

अफगाणिस्तानचा गोलंदाज आणि आयपीएल संघ सनरायझर हैदराबादमधील शिखराचा सहकारी रशीद खानला शिखराच्या हॅक झालेल्या अकाउंटवरून मॅसेज गेला होता. याबद्दलचे रशीदने ट्विट केले.
- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -