घरक्रीडाआयसीसीनेच क्रिकेट संपवले!

आयसीसीनेच क्रिकेट संपवले!

Subscribe

शोएब अख्तरची टीका

मागील दहा वर्षांत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) हळूहळू क्रिकेट संपवले आहे, अशी टीका पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने जागतिक संघटनेवर केली आहे. आयसीसीने मागील दहा वर्षांत नियमांत बरेच बदल केले आहेत. आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोन नवे चेंडू वापरले जातात. त्यामुळे बॅट आणि चेंडू यांच्यात समतोलच उरलेला नाही. क्रिकेट हा केवळ फलंदाजांचा खेळ बनला आहे, असे अख्तर भारताचा माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकरशी चर्चा करताना म्हणाला.

मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये वेगवान गोलंदाज अधिक स्लोअर-बॉलचा वापर करतात आणि फिरकीपटू पूर्वीपेक्षा अधिक वेगाने चेंडू टाकत आहेत याबाबत तुला काय वाटते असे मांजरेकरने अख्तरला विचारले. यावर अख्तर म्हणाला, आयसीसीने मागील दहा वर्षांत हळूहळू क्रिकेट संपवले आहे. मी अगदी उघडपणे आणि स्पष्टपणे बोलत आहे. त्यांना जे करायचे होते, ते त्यांनी केले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये एका षटकात केवळ एका बाऊंसरचा नियम बदला हे मी वारंवार सांगत आहे. तुम्ही दोन नव्या चेंडूंनी खेळता आणि केवळ चार क्षेत्ररक्षक ३० यार्ड वर्तुळाच्या बाहेर असतात. त्यामुळे दहा वर्षांत क्रिकेटचा स्तर उंचावला आहे की खालावला आहे, हे आयसीसीला विचारा. आता सचिन विरुद्ध शोएबसारखे द्वंद्व रंगते कुठे?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -