घरक्रीडाचौथ्या क्रमांकासाठी श्रेयसच योग्य!

चौथ्या क्रमांकासाठी श्रेयसच योग्य!

Subscribe

भारतीय एकदिवसीय संघात चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यरने खेळले पाहिजे, असे मत भारताचा माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळेने व्यक्त केले. श्रेयसने मागील काही काळात एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याने काही महिन्यांपूर्वी झालेल्या वेस्ट इंडिज दौर्‍यातील दोन एकदिवसीय सामन्यांत पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना १३६ धावा केल्या होत्या. त्या मालिकेत रिषभ पंत चौथ्या क्रमांकावर खेळला होता. मात्र, आता विंडीजविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेत श्रेयसला चौथ्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळाली पाहिजे, असे कुंबळेला वाटते.

शिखर (धवन) या मालिकेत खेळणार नसल्याने लोकेश राहुल भारताच्या डावाची सुरुवात करेल. श्रेयस अय्यरमध्ये किती प्रतिभा आहे, हे आपण पाहिले आहे. त्याने आपल्या खेळात खूप सुधारणा केली असून तो आता अधिक परिपक्व झाला आहे. त्यामुळे विंडीजविरुद्ध त्याला चौथ्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळाली पाहिजे, असे कुंबळे म्हणाला. श्रेयसने आतापर्यंत ९ एकदिवसीय सामने खेळले असून त्यात ४ अर्धशतकांच्या मदतीने ३४६ धावा केल्या आहेत.

- Advertisement -

भारत आणि विंडीजमधील एकदिवसीय मालिकेला १५ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेत विंडीज फलंदाजांना रोखण्यासाठी भारतीय गोलंदाजांना सर्वोत्तम खेळच करावा लागेल, असे कुंबळेला वाटते. विंडीज संघात फटकेबाजी करणारे बरेच फलंदाज आहेत. तसेच भारतातील खेळपट्ट्या फलंदाजांना अनुकूल असतात. त्यामुळे भारतीय गोलंदाजांना विंडीज फलंदाजांना रोखणे अवघड जाऊ शकेल, असे कुंबळेने नमूद केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -