घरक्रीडाम्हणून मी ती एक धाव काढली नाही !

म्हणून मी ती एक धाव काढली नाही !

Subscribe

दिनेश कार्तिकचे स्पष्टीकरण

न्यूझीलंडविरुद्धच्या अखेरच्या टी-२० सामन्यात भारताला ४ धावांनी पराभूत व्हावे लागले. या पराभवामुळे भारताने ही मालिका २-१ अशी गमावली. या सामन्यात २१२ धावांचे पाठलाग करताना भारताला शेवटच्या षटकात हा सामना जिंकण्यासाठी १६ धावांची गरज होती, मात्र दिनेश कार्तिक आणि कृणाल पांड्याला टीम साऊथीच्या या षटकात ११ धावाच काढता आल्या. या षटकाच्या तिसर्‍या चेंडूवर दिनेश कार्तिकला एक धाव काढायची त्याला संधी होती, पण एक धाव काढून कृणाल पांड्याला स्ट्राइक देण्याऐवजी त्याने स्वत:कडेच स्ट्राइक ठेवली. त्यामुळे भारताने हा सामना गमावल्यानंतर अनेकांनी कार्तिकवर टीका केली होती. मी ती धाव काढली नाही, कारण मला पुढील चेंडूवर षटकार मारू शकेन असा विश्वास होता, असे आता कार्तिकने स्पष्टीकरण दिले आहे.

मला वाटते की मी आणि कृणाल संघ अवघड परिस्थितीत (६ बाद १४५) असताना चांगली फलंदाजी केली. आम्ही हा सामना शेवटपर्यंत नेऊन गोलंदाजांना दबावात टाकले. त्यावेळी आम्हाला विश्वास होता की आम्ही संघाला सामना जिंकवून देऊ शकू. शेवटच्या षटकात ती एक धाव काढण्यास मी नकार दिला कारण मला खरच असे वाटले होते की मी पुढील चेंडूवर षटकार मारू शकेन, असे कार्तिक म्हणाला. कार्तिकने त्या सामन्यात नाबाद ३३ धावांची खेळी केली होती, तर त्याने आणि कृणालने सातव्या विकेटसाठी २८ चेंडूंत ६८ धावांची भागीदारी केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -