घरIPL 2020IPL 2020 : युवा प्रियम गर्गच्या खेळीची सोशल मीडियावर चर्चा

IPL 2020 : युवा प्रियम गर्गच्या खेळीची सोशल मीडियावर चर्चा

Subscribe

चेन्नईविरुद्ध गर्गने नाबाद ५१ धावांची खेळी केली. 

चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या आयपीएल सामन्यात सनरायजर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १६४ अशी धावसंख्या उभारली. हैदराबादचा संघ हा अव्वल तीन फलंदाज म्हणजेच डेविड वॉर्नर, जॉनी बेअरस्टो आणि मनीष पांडे यांच्यावर अवलंबून आहे असे म्हटले जाते. परंतु, चेन्नईविरुद्ध त्यांना फारशा धावा करता आल्या नाहीत. बेअरस्टो (०), पांडे (२९) आणि वॉर्नर (२८) हे फार काळ खेळपट्टीवर टिकले नाहीत. तसेच मागील सामन्यात ४१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करणारा केन विल्यमसनही केवळ ९ धावा करून धावचीत झाला. त्यामुळे हैदराबादचा संघ ४ बाद ६९ असा अडचणीत सापडला होता. मात्र, मागील वर्षी १९ वर्षांखालील वर्ल्डकपमध्ये भारताचे नेतृत्व करणाऱ्या प्रियम गर्गने हैदराबादचा डाव सावरला.

सचिन, सेहवागने केले कौतुक 

१९ वर्षीय प्रियम गर्गने २६ चेंडूत नाबाद ५१ धावांची खेळी केली. त्याचे हे आयपीएल स्पर्धेतील पहिलेवहिले अर्धशतक होते. त्याला २० वर्षीय डावखुरा फलंदाज अभिषेक शर्माने ३१ धावांची खेळी केली. मात्र, खासकरून गर्गने दबावात संयम राखून केलेल्या अर्धशतकाची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. सचिन तेंडुलकर आणि विरेंद्र सेहवाग यांसारख्या महान भारतीय क्रिकेटपटूंनी गर्गचे कौतुक केले.

- Advertisement -

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -