घरIPL 2020IPL 2020 : चेन्नईच्या काही फलंदाजांना वाटते, ते सरकारी नोकरी करत आहेत!

IPL 2020 : चेन्नईच्या काही फलंदाजांना वाटते, ते सरकारी नोकरी करत आहेत!

Subscribe

भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने चेन्नईच्या फलंदाजांवर टीका केली आहे. 

चेन्नई सुपर किंग्सच्या संघाला यंदाच्या आयपीएल मोसमात चांगली कामगिरी करण्यात अपयश येत आहे. त्यांना सहा पैकी केवळ दोन सामने जिंकता आले आहेत. खासकरून त्यांच्या फलंदाजांची कामगिरी फारच निराशजनक ठरली आहे. नुकत्याच झालेल्या कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात चेन्नईचा १० धावांनी पराभव झाला. या सामन्यात कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना १६७ धावा केल्या, ज्याचा पाठलाग करताना चेन्नईला १५७ धावाच करता आल्या. या सामन्यात चेन्नईच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी संथ गतीने फलंदाजी केली. त्यामुळे भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने चेन्नईच्या फलंदाजांवर टीका केली आहे.

बरेच डॉट बॉल खेळले

‘१६८ धावांचे आव्हान म्हणजे फार मोठे नव्हते. चेन्नईने या धावा केल्या पाहिजे होत्या. मात्र, केदार जाधव आणि रविंद्र जाडेजा यांनी बरेच चेंडू खेळून काढले. ते बरेच डॉट बॉल खेळले. याचाच फटका चेन्नईला बसला. माझ्या मते चेन्नईच्या काही फलंदाजांना असे वाटते की ते सरकारी नोकरी करत आहेत. आपण काम केले अथवा नाही, आपल्याला पगार मिळणार हे त्यांना ठाऊक आहे,’ असे सेहवाग म्हणाला. कोलकाताविरुद्ध चेन्नईने खासकरून मधल्या षटकांत अत्यंत निराशाजनक खेळ केला. त्यांना ११ ते १४ या षटकांत केवळ १४ धावा करता आल्या. या षटकांदरम्यान त्यांनी खेळपट्टीवर स्थिरावलेले शेन वॉटसन (५०) आणि अंबाती रायडू (३०) यांच्या विकेट गमावल्या. त्यानंतर कर्णधार धोनी, जाधव यांना चांगला खेळ करता आला नाही आणि चेन्नईने सामना गमावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -