घरक्रीडाकोहली माणूस आहे का? प्रश्न पडतो - तमिम इक्बाल

कोहली माणूस आहे का? प्रश्न पडतो – तमिम इक्बाल

Subscribe

भारताचा कर्णधार विराट कोहली ज्याप्रकारे खेळतो त्यावरून तो कधीकधी माणूस आहे का हा प्रश्न पडतो असे तमिम इक्बाल म्हणाला आहे.

विराट कोहलीच्या नावे अनेक विक्रम आहेत. तो सध्या कसोटी आणि एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. तो जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून ओळखला जातो. तो इतकी चांगली फलंदाजी करतो की तो कधीकधी माणूस आहे का हा प्रश्न पडतो असे बांगलादेशचा फलंदाज तमिम इक्बाल म्हणाला आहे.

असे वाटते की तो प्रत्येक सामन्यात शतक मारेल 

तमिम विराटविषयी म्हणाला, “मला कधीकधी कोहली माणूस आहे का हा प्रश्न पडतो. काय खेळतो तो ! तो फलंदाजीला आला की असे वाटते तो प्रत्येक सामन्यात शतक मारेल. तो ज्याप्रकारे स्वतःवर मेहनत घेतो ते खरंच कौतुकास्पद आहे. तो अप्रतिम फलंदाज आहे. माझ्यामते तो कसोटी, वनडे आणि टी-२० या तिन्ही प्रकारात तो सर्वोत्तम खेळाडू आहे. तो एक असा खेळाडू आहे की त्याच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे.”

कोहलीइतके सातत्यपूर्ण कोणीही नाही

कोहलीने विंडीजविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात ८१ धावा केल्यास तो वनडेमध्ये सर्वात जलद १०००० धावा करणारा खेळाडू बनेल. त्याविषयी तमिम म्हणाला, “मागच्या १२ वर्षात मी खेळाडू पाहिले. त्यांच्याविरुद्ध खेळलो. सगळ्यांमध्ये काहीतरी खास असते. पण कोहलीइतका सातत्याने धावा करणारा फलंदाज बघितला नाही. तो अप्रतिम फलंदाज आहे.”

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -