घरक्रीडाभारतीय क्रिकेटरच्या उपचारासाठी 'दादा' धावून आला!

भारतीय क्रिकेटरच्या उपचारासाठी ‘दादा’ धावून आला!

Subscribe

भारताचा माजी क्रिकेटपटू जेकब मार्टिनच्या उपचारासाठी 'दादा' म्हणजे सौरभ गांगुली पुढे आला आहे. सौरव गांगुलीने मार्टिनच्या उपचाराची जबाबदारी घेतली आहे.

भारताचा माजी क्रिकेटपटू जेकब मार्टिन सध्या रुग्णालयामध्ये मृत्यूशी झुंज देत आहे. २८ डिसेंबर रोजी मार्टिनचा अपघात झाला होता. या अपघातामध्ये मार्टिनच्या फुफ्फुस आणि यकृताला गंभीर दुखापत झाली होती. मार्टिन सध्या वडोदरा रुग्णालयामध्ये उपचार घेत आहे. मार्टिनच्या उपचारासाठी मोठा खर्च लागणार आहे. त्याच्या उपचारासाठी अनेक क्रिकेटपटूंनी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने मार्टिनच्या उपचारासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन मार्टिनच्या कुटुंबियांना दिले आहे.

हेही वाचा – ‘या’ माजी क्रिकेटपटूच्या उपचारासाठी बीसीसीआयने केली आर्थिक मदत

- Advertisement -

‘तुम्ही एकटे नाही’ – गांगूली

मार्टिनने १९९९ मध्ये भारतीय वंडे सामन्यात पदार्पण केले. दहा वनडे सामन्यांमध्ये मार्टिनने भारताचे प्रतिनिधित्व केले. सौरव गांगुलीने मार्टिनच्या घरच्यांना तुम्ही एकटे नाहीत, असे म्हटले आहे. गांगुलीने सांगितले की, ‘मार्टिन आणि मी एकत्र खेळलो आहोत. तो खूप शांत व्यक्ती आहे. तो लवकर बरा व्हावा, अशी देवाकडे प्रार्थना करतो. त्याच्या कुटुंबियांना सांगू इच्छितो की, तुम्ही एकटे नाही.’

हेही वाचा – ‘आता तुमची गरज नाही’, बीसीसीआयने ‘त्यांना’ हाकललं!

- Advertisement -

बीसीसीआयनेही केली मदत

जेकब मार्टिनवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बीसीसीआयने देखील त्याच्या उपचारासाठी ५ लाख रुपयांची मदत केली आहे. त्याचबरोबर बडोदा क्रिकेट असोसिएशननेही ३ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. बडोदा क्रिकेट असोसिएशनचे माजी सचिव संजय पटेल हे मार्टिनच्या मदतीला धावून आले होते. त्यांनी त्यांच्या इतर क्रिकेटर मित्रांना मार्टिनला मदत करण्याची विनंती केली होती. त्यांच्या विनंतीचा मान राखून रवी शास्त्री यांनी मदत करण्याचे आश्वासन दिले. रवी शास्त्रीसोबत इरफान पठान, युसूफ पठान आणि मुनाफ पटेल यांनीदेखील मदतीचे आश्वासन दिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -