Friday, January 15, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा सौरव गांगुलीची प्रकृती स्थिर, पण पुन्हा अ‍ॅन्जिओप्लास्टी होणार   

सौरव गांगुलीची प्रकृती स्थिर, पण पुन्हा अ‍ॅन्जिओप्लास्टी होणार   

गांगुलीला येत्या एक-दोन दिवसांत त्यालाडिस्चार्ज मिळणार आहे.

Related Story

- Advertisement -

बीसीसीआय अध्यक्ष आणि भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला मंगळवार किंवा बुधवारी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळणार आहे. मात्र, येत्या काही दिवसांत त्याची आणखी एक अ‍ॅन्जिओप्लास्टी होण्याची शक्यता आहे. गांगुलीला शनिवारी सौम्य हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे त्याला कोलकात्याच्या वूडलॅंड्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अ‍ॅन्जिओप्लास्टी झाल्यावर त्याची प्रकृती स्थिर होती. आता त्याच्या प्रकृतीत आणखी सुधारणा झाल्याने येत्या एक-दोन दिवसांत त्याला डिस्चार्ज मिळणार आहे.

गांगुलीवर उपचार करण्यासाठी नऊ सदस्यीय वैद्यकीय समिती स्थापन करण्यात आली आहे, अशी माहिती वूडलॅंड्स हॉस्पिटलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुपाली बासू यांनी दिली. गांगुलीची प्रकृती स्थिर आहे. त्याच्यावर आणखी एक अ‍ॅन्जिओप्लास्टी करण्यात येणार होती. मात्र, सध्या अ‍ॅन्जिओप्लास्टी लांबणीवर टाकणे हा सुरक्षित पर्याय असल्याचेही रुपाली बासू यांनी सांगितले.

- Advertisement -

गांगुलीला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर त्याची अनेकांनी भेट घेतली. बीसीसीआयचे सचिव जय शाह हेसुद्धा गांगुलीला भेटले होते. दादा हा भारताचा हिरो आहे. त्याने क्रिकेटमध्ये बरेच चढ-उतार पाहिले आहेत. त्याने अनेकदा प्रतिस्पर्ध्यांवर आणि आव्हानांवर मात केली आहे. आताही तो तेच करेल. मी त्याला भेटलो, तेव्हा तो हसत होता. त्याची प्रकृती स्थिर आहे, असे शाह म्हणाले.

- Advertisement -