‘त्या’ एका चुकीमुळे दक्षिण आफ्रिका संघावर कायमची बंदी घातली जाऊ शकते

south africa cricket in trouble risk ban from international cricket after govt suspends CSA

दक्षिण आफ्रिकेच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघावर मोठं संकट घोंघावत असून आतापर्यंतचे सर्वात मोठं सकट आहे. दक्षिण आफ्रिका सरकारने दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाला निलंबित केलं असून बोर्डावर सरकार नियंत्रण ठेवणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (ICC) बंदी घालू शकते. दक्षिण आफ्रिका सरकारचा हा निर्णय आयसीसीच्या नियमांविरोधात आहे.

दक्षिण क्रिकेट बोर्डातील अंतर्गत कलहामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. बऱ्याच काळापासून वंशवाद, भ्रष्टाचार आणि खेळाडूंच्या पगाराच्या मुद्द्यांवरून दक्षिण आफ्रिका बोर्ड वादात होता. दक्षिण आफ्रिकेच्या क्रीडा व ऑलिम्पिक समितीने एक पत्र लिहून सर्व बोर्ड अधिकाऱ्यांना पद सोडायला सांगितलं आहे. SASCOC ही दक्षिण आफ्रिकेची खास संस्था आहे जी देशाचे सरकार आणि क्रीडा महासंघ यांच्याततील मध्यस्थीचा दुवा आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिका बोर्डातील वादांबाबत आफ्रिकेच्या क्रीडा व ऑलिम्पिक समितीने चौकशी सुरु केली. यानंतर हा मोठा निर्णय घेण्यात आला.

आयसीसीच्या नियमांनुसार आता क्रिकेट दक्षिण आफ्रिकेवर बंदीची टांगती तलवार आहे. आयसीसीच्या नियमांनुसार देशाच्या क्रिकेट संस्थेत कोणत्याही प्रकारचे सरकारी हस्तक्षेप होता कामा नये. या नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल आयसीसी त्या क्रिकेट मंडळावर बंदी आणू शकते. काही महिन्यांपूर्वी आयसीसीने झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डावर अशाच एका नियमानुसार बंदी घातली होती. दरम्यान, आफ्रिकेचा संघ दुसऱ्यांदा बॅन होऊ शकतो. याआधी १९७० ते १९९० या काळाता वंशवादामुळे बॅन करण्यात आला होता.