घरक्रीडादक्षिण आशियाई खो-खो : भारताची दुहेरी सुवर्ण कमाई

दक्षिण आशियाई खो-खो : भारताची दुहेरी सुवर्ण कमाई

Subscribe

नेपाळ येथे सुरु असलेल्या तेराव्या दक्षिण आशियाई स्पर्धेतील खो-खोमध्ये भारताने पुरुष आणि महिला या दोन्ही गटांत जेतेपदाला गवसणी घातली. खो-खो स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्याची ही दोन्ही संघांची सलग दुसरी वेळ होती.

पुरुष गटातील अंतिम सामन्यात भारताने बांगलादेशचा १६-९ असा एक डाव आणि सात गुणांनी पराभव करत सलग दुसरे सुवर्णपदक पटकावले. भारताच्या या विजयात दीपक माधव (२:१० मि. संरक्षण आणि पाच गडी), बी. राजू (२:५० मि. संरक्षण आणि दोन गडी), अक्षय गणपुले (२:५० मि. संरक्षण), सागर पोतदार (२:२० मि. संरक्षण), सुदर्शन आणि अभिनंदन पाटील (प्रत्येकी तीन गडी) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पुरुषांच्या तिसर्‍या क्रमांकाच्या सामन्यात नेपाळने बांगलादेशवर १३-७ अशी एक डाव आणि सहा गुणांनी मात केली.

- Advertisement -

महिलांच्या अंतिम सामन्यात भारताने यजमान नेपाळवर १७-५ असा एक डाव आणि बारा गुणांनी विजय मिळवत सुवर्णपदक जिंकले. या सामन्याच्या पहिल्या डावात ऐश्वर्या सावंत (३:४० मि. संरक्षण), प्रियंका भोपी (२:५० मि. संरक्षण), कर्णधार नसरीन आणि काजल भोर (प्रत्येकी पाच बळी) यांनी भारताकडून चमकदार खेळ केला. दुसर्‍या डावात सस्मिता शर्मा (२:३० मि. संरक्षण), मुकेश (३:०० मि. संरक्षण) यांनी उत्तम खेळ करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. महिलांच्या तिसर्‍या क्रमांकाच्या सामन्यात बांगलादेशने श्रीलंकेला १०-७ असे पराभूत केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -