घरक्रीडास्पेनसमोर क्रोएशिया हतबल

स्पेनसमोर क्रोएशिया हतबल

Subscribe

फुटबॉल विश्वचषक २०१८ मध्ये उपविजेता ठरणाऱ्या क्रोएशियाचा स्पेन संघाने युएफा नेशन्स लीगच्या सामन्यात ६-० असा पराभव केला.

काही महिन्यांपूर्वीच झालेल्या फुटबॉल विश्वचषक २०१८ मध्ये क्रोएशियाने अंतिम फेरीपर्यंतची मजल मारली होती. तर स्पेनचा बाद फेरीच्या पहिल्याच सामन्यात रशियाने पराभव केला होता. पण युएफा नेशन्स लीगच्या सामन्यात स्पेनने क्रोएशियाचा धुव्वा उडवला आहे. स्पेनने हा सामना ६-0 असा जिंकला.

- Advertisement -

असा झाला सामना

या सामन्यात स्पेनने आक्रमक सुरूवात केली. याचा फायदा त्यांना २४ व्या मिनिटाला झाला. साऊलने हेडर मारत स्पेनला १-० अशी आघाडी मिळवून दिली. ३३ व्या मिनिटाला मार्को असेन्सिओने अप्रतिम गोल मारत स्पेनची आघाडी २-० केली. पुन्हा ३५ व्या मिनिटाला असेन्सिओने आपली जादू दाखवली. त्याने मारलेला फटका गोलपोस्टवरून क्रोएशियाचा गोलकिपर कालिनीच याला लागून गोलमध्ये गेला. त्यामुळे स्पेनची आघाडी ३-० अशी झाली. मध्यंतरापर्यंत स्पेनने आपली आघाडी कायम ठेवली.

मध्यंतरानंतरही स्पेनने आपला आक्रमक खेळ सुरुच ठेवला. ४९ व्या मिनिटाला रॉड्रिगोने केलेल्या गोलमुळे स्पेनची आघाडी ४-० झाली. तर ५७ व्या मिनिटाला कर्णधार सर्जिओ रॅमोसने हेडरवर गोल मारत स्पेनचा पाचवा गोल केला. ७० व्या मिनिटाला इस्कोने गोल करत स्पेनला ६-० असा विजय मिळवून दिला. स्पेनविरुद्धचा हा पराभव क्रोएशियाच्या इतिहासातील सर्वात मोठा पराभव ठरला आहे.

- Advertisement -

मार्को असेन्सिओचा अप्रतिम खेळ

स्पेनचा युवा खेळाडू मार्को असेन्सिओ याने या सामन्यात अप्रतिम प्रदर्शन केले. त्याने या सामन्यात १ गोल आणि ३ असिस्ट केले. या सामन्यात केलेला गोल हा त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिला गोल होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -