घरक्रीडाश्रीलंकेने उडवला इंग्लंडचा धुव्वा

श्रीलंकेने उडवला इंग्लंडचा धुव्वा

Subscribe

५ सामन्यांच्या मालिकेतील ३ सामने गमावणाऱ्या श्रीलंकेने मालिकेचा शेवट गोड केला.

फलंदाज आणि अकिला धनंजयाने केलेल्या अप्रतिम प्रदर्शनाच्या जोरावर श्रीलंकेने पाचव्या वनडे सामन्यात इंग्लंडचा डकवर्थ-लुईस नियमानुसार २१९ धावांनी पराभव केला. पण इंग्लंडने ही मालिका ३-१ अशी जिंकली. या सामन्यात सर्वाधिक ९५ धावा करणाऱ्या निरोशन डिकवेलाला सामनावीराचा खिताब मिळाला.

फलंदाजांचे अप्रतिम प्रदर्शन  

या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांचे सलामीवीर निरोशन डिकवेला आणि समरविक्रमा यांनी अप्रतिम सुरूवात केली. या दोघांनी पहिल्या विकेसाठी अवघ्या १९ षटकांत १३७ धावा फलकावर लावल्या. ५४ धावा करून समरविक्रमा बाद झाला. पण डिकवेलाने कर्णधार दिनेश चंडिमलच्या साथीने चांगली फलंदाजी केली. डिकवेलाने ९५ धावा केल्या. त्याला मोईन अलीने बाद केले. तो बाद झाल्यावर चंडिमल आणि कुशल परेरा यांनी चांगला खेळ केला. या दोघांनी १०२ धावांची भागीदारी केली. चंडिमलने ८० तर परेराने ५६ धावा केल्या. या फलंदाजांच्या अप्रतिम खेळामुळे श्रीलंकेने ३६६ धावांचा डोंगर उभारला.

मॉर्गनशिवाय इंग्लंडचा डाव गडगडला

३६७ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली. त्यांनी अवघ्या ४ धावांत ३ विकेट गमावल्या. यानंतर बेन स्टोक्सने ६७ धावा करत इंग्लंडला सामन्यात परत आणण्याचा प्रयत्न केला. पण तो यात कमी पडला आणि इंग्लंडला पराभवाला सामोरे जावे लागले.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -