रत्नागिरी कॅरम लीगला प्रारंभ

Mumbai
कॅरम लीग
कॅरम लीग

रत्नागिरी, रत्नागिरी येथे सुरु असलेल्या रत्नागिरी कॅरम लीग सिझन ४ मध्ये गत विजेत्या कॅरम मास्टर्सला मातोश्री विनर्सने साखळीतीळ पहिल्या सामन्यातच ३-० असे पराभूत करून स्पर्धेतील पहिला हादरा दिला. मातोश्रीच्या अभिषेक चव्हाणने कॅरम मास्टर्सच्या रियाझ अकबर अलीला २५-९, २५-१३ असे सहज हरवून संघाला आघाडी मिळवून दिली. तर मातोश्री विनर्सच्या संदीप दिवेने कॅरम मास्टर्सच्या विकास धारियाला ७-१२, २५-१०, २५-१० असे हरविले.

दुहेरीत मातोश्री विनर्सच्या अनिल मुंढे व संदीप देवरुखकर जोडीने कॅरम मास्टर्सच्या अशोक गौर व राहुल भस्मे जोडीला २५-१७, १६-१३ असे नमवून संघाला विजय मिळवू दिला. इंडियन ऑइल, भारतीय आयुर्विमा महामंडळ , ओ एन जी सी, क्रिस्टल व हॉटेल विवेक प्रायोजित या लीगच्या इतर सामन्यांमध्ये व्हिक्टोरिअन्सने ग्लेक्सिचा क्लस्टर्सचा ३ -० असा सहज पराभव केला. झियां फूड्सने रवी स्ट्राईकर्सचा ३-० असा पराभव केला. कॅरम हिटर्स विरुद्धचा सत्यशोधक स्ट्राईकर्स हा सामना चांगला रंगला कॅरम हिटर्सने यात बाजी मारली. त्यांनी २-१ अशा फरकाने विजय मिळविला. कॅरम हिटर्सच्या योगेश धोंगडे व दत्ताराम वासावे जोडीने सत्यशोधक स्ट्राईकर्सचा २०-१७, १३-१२ असा पराभव केला.

परंतु कॅरम हिटर्सच्या अभिजीत खेडेकरचा सत्यशोधक स्ट्राईकर्सच्या प्रशांत मोरेकडून १४-१९, १-२५ असा पराभव पत्करावा लागला. दुहेरीच्या लढतीत कॅरम हिटर्सने बाजी मारली. त्यांच्या पंकज पवार व जलाल मुल्ला जोडीने सत्य शोधक स्ट्राईकर्सच्या राजेश गोहिल व एस. कोंडविलकरवर ९-१८, १८-१०, २५-१७ असा विजय मिळविला.