घरक्रीडावसईत राज्यस्तरीय शूटिंगबॉल स्पर्धा

वसईत राज्यस्तरीय शूटिंगबॉल स्पर्धा

Subscribe

वसईत दुसर्‍या राज्यस्तरीय शूटिंगबॉल स्पर्धेचे आज शुक्रवार २१ फेब्रुवारीला आयोजन करण्यात आले आहे. देवाळे रंजन क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या स्पर्धेत राज्यभरातून 24 संघ सहभागी होणार आहेत.

उत्कृष्ट शूटिंगबॉलपटू असलेल्या मनिषने तालुका व जिल्हा पातळीवरील अनेक शूटिंगबॉल स्पर्धांत चांगली कामगिरी केली होती. 1997 साली 19 वर्षांखालील महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी त्याची ठाणे जिल्ह्यातून निवड झाली होती. वसई ते लेह-लडाख प्रवास तसेच समुद्रसपाटीहून 5 हजार 602 मीटर (18 हजार 380 फूट) हा जगातील सर्वांत उंच असलेल्या खारदूंगला पास या मार्गावर जाण्यासाठी आखलेल्या मोहिमेत त्याचा यशस्वी सहभाग होता. वसई अ‍ॅडव्हेंचर क्लब या गिरिभ्रमण संस्थेचा सभासद होता.

- Advertisement -

वसईतील देवाळे या गावातील मनिषचा 2017 साली अपघाती मृत्यू झाला होता. त्याच्या स्मृतिप्रित्यर्थ तो राहात असलेल्या देवाळे येथील रंजन क्रीडा मंडळ वसईमार्फत शूटिंगबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. यास्पर्धेत महाराष्ट्रातील निवडक 24 संघांना प्रवेश दिला जाणार आहे. यात मुंबई, पालघर, सफाळे, डहाणू, नवी मुंबई, रायगड, सोलापूर, कोल्हापूर, टेंभुर्णी, सोलापूर, सिल्लोड, औरंगाबाद, पुणे, मालेगांव, सांगली यासह इतर जिल्ह्यातील दर्जेदार संघांचा समावेश असणार आहे.

विजेत्या प्रथम दोन संघाला रोख पारितोषिके व चषक दिला जाणार आहे. त्याचप्रमाणे तृतीय ते आठव्या क्रमांकांच्या विजेत्यांना रोख पारितोषिके दिली जाणार आहेत. बेस्ट शूटर, बेस्ट डिफेंडर, बेस्ट नेटमन ही विशेष रोख पारितोषिके देण्यात येतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -