स्टीव्ह स्मिथची क्रिकेटमध्ये वापसी

steve smith
स्टीव्ह स्मिथ

कॅनडात होणाऱ्या ग्लोबल टी-२० कॅनेडा स्पर्धेत करणार आगमन

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ याच्यावर बॉल टेम्परिंगच्या आरोपानंतर त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यास बंदी घालण्यात आली. मात्र आता त्याला डोमेस्टीक क्रिकेट खेळता येणार आहे. कॅनडा येथे होणाऱ्या टी-२० सामन्यांच्या स्पर्धेत तो खेळणार आहे. २८ जून पासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेत स्मिथ क्रिकेटमध्ये आपली पुन्हा वापसी करणार आहे. मार्चमध्ये झालेल्या दक्षिण आफ्रीकेच्या दौऱ्यातील तिसऱ्या टेस्टमध्ये बॉल टेम्परिंग केल्याच्या आरोपखाली ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर आणि टेस्ट क्रिकेटमधील उत्कृष्ट खेळाडू स्मिथला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित केले आहे. उपकर्णधार डेविड वॉर्नरवर देखील हा आरोप असून त्यालाही एक वर्ष निलंबित केले गेले आहे.

स्मिथवर लागलेल्या आरोपामुळे त्याला यावर्षी आयपीएलच्या सामन्यांनाही मुकावे लागले असून राजस्थान रॉयल्सचा कर्णधार पदालाही तो मुकला. पुढील एक वर्ष आंतराष्ट्रीय क्रिकेट आणि पुढील दोन वर्ष ऑस्ट्रेलियाचे कर्णधारपद यापासूनही त्याला वंचित रहावे लागणार आहे.

द ग्लोबल टी-२० कॅनडा स्पर्धा

कॅनडात होणारी हि स्पर्धा २८ जून पासून सुरु होणार आहे. ज्यात बरेच दिग्गज खेळाडू खेळताना दिसतील. यात ख्रिस गेल, आंद्रे रसेल, शाहीद आफ्रिदी असणार आहेत. ग्लोबल टी-२० कॅनेडा या स्पर्धेत पाच कॅनेडियन संघ आणि वेस्ट इंडीजच्या प्रतिनिधींचा एक संघ असणार आहे. सामन्यांचे नेमके वेळापत्रक पुढील आठवड्यात समजणार आहे. स्पर्धेतील सहा संघांमध्ये कॅरेबियन ऑल-स्टार, टोरँटो नॅशनल, मॉन्ट्रियल टायगर, ओटावा रॉयल्स, व्हँकुअर नाईट्स आणि विन्नीपेग हॉक्स यांचा समावेश आहे. या लीगमध्ये २२ सामने खेळले जातील आणि १६ जुलै रोजी अंतिम सामना खेळला जाणार आहे. या स्पर्धा मॅपल लीफ क्रिकेट क्लब येथे होतील, जो टोरोंटोच्या उत्तरेस आहे, ज्याची क्षमता ७००० सीटची आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here