भारतीय संघाचा श्रीलंकेविरुद्ध टी-२० सामना पुण्यात रंगत आहे. हा सामना सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाचा मराठमोळा अष्टपैलू फलंदाज केदार जाधवचा बीसीसीआयने एक व्हिडिओ शेअर केला. ज्यामध्ये केदार जाधव पुण्यातील ग्रीन हाऊसची माहिती देताना दिसत आहे. या व्हिडिओद्वारे केदारने घरातील खास गोष्टी चाहत्यांना दाखवल्या आहेत. बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमधील घर हे केदारचे ड्रीम हाऊस आहे. याशिवाय केदारने बॉलिवूड अभिनेता सलमान खानने दिलेल्या खास भेटीबद्दल देखील सांगितलं आहे.
केदार जाधव हा सलमान खानचा खूप मोठा चाहता असून तो अनेकवेळा सलमानची मेमिक्रीही करतो. इतकेच नाही तर भारतीय संघातील काही खेळाडू त्याला ‘सल्लू’ देखील बोलतात. सलमान खानने त्याला जीमचं साहित्य भेट म्हणून दिलं आहे. त्यामुळे व्हिडिओमध्ये केदारने सलमान खानचे आभार मानले आहेत.
WATCH: Pune Tales – Sneak peek of Kedar Jadhav's house ? @JadhavKedar takes us on a stroll through his memories and stories as he gives an exclusive tour of his abode in Pune. – by @28anand #TeamIndia
Full video here ?️? https://t.co/dXMVO4DPRb pic.twitter.com/W7km3N5OPy
— BCCI (@BCCI) January 10, 2020
केदारला पुण्यात सुरू असलेल्या श्रीलंकेविरुद्ध टी-२० सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही आहे. परंतु त्यांची १४ जानेवारीपासून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी निवड झाली आहे. टी-२० मालिकेचा शेवटचा सामना सध्या पुण्यात सुरू आहे. १४ जानेवारीला एकदिवसीय मालिकेचा पहिला सामना हा वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
हेही वाचा – पराभवाकडून पराभवाकडे!