घरक्रीडाIPL च्या तेराव्या हंगामासाठी कडक नियम, खेळाडूंची होणार ४ वेळा कोरोना चाचणी

IPL च्या तेराव्या हंगामासाठी कडक नियम, खेळाडूंची होणार ४ वेळा कोरोना चाचणी

Subscribe

आयपीएलचा तेरावा हंगाम होण्यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर आयोजनासाठी बीसीसीआय सज्ज झालेलं आहे. २९ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबर या काळात युएईमध्ये आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं आयोजन केलं जाणार आहे. काही दिवसांपूर्वी गव्हर्निंग काऊन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी याबाबतची माहिती दिली. कोरोनाच्या धर्तीवर आयपीएल होत असल्यामुळे बीसीसीआय या स्पर्धेसाठी सर्व संघांना कडक नियम आखले असून बीसीसीआयने तेराव्या हंगामासाठी काही मार्गदर्शक तत्वे तयार केली आहेत. गव्हर्निंग काऊन्सिलच्या आगामी बैठकीत याबद्दल जाहीर केलं जाणार आहे.

बीसीसीआयने तयार केलेल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये प्रेक्षकांना मैदानात परवानगी नाही, स्टुडीओमध्ये समालोचन करणारी मंडळी सहा फुटांचं अंतर राखून बसतील, डग आऊटमध्ये खेळाडूंची कमी गर्दी, ड्रेसिंग रुममध्ये १५ पेक्षा जास्त खेळाडूंना परवानगी नाही. प्रत्येक खेळाडूची दोन आठवड्यात ४ वेळा कोरोना चाचणी आणि सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळून पोस्ट मॅच प्रेझेंटेशन, असे काही नियम बीसीसीआयने तयार केल्याची चर्चा आहे. या नियमांबद्दल बीसीसीआयने सर्व संघमालकांनाही कल्पना दिलेली आहे. इंडियन एक्सप्रेसने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. दरम्यान, भारत सरकारकडून अद्याप बीसीसीआयला तेराव्या हंगामासाठी प्रवासासाठी परवानगी मिळालेली नसली तरीही येत्या काही दिवसांमध्ये याबद्दल अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

- Advertisement -

पत्नी आणि गर्लफ्रेंड यांना युएईला येऊ द्यायचं की नाही हा निर्णय बीसीसीआय घेणार नाही. आम्ही हा निर्णय त्या-त्या संघमालकांवर सोडला आहे. पण आम्ही तयार केलेल्या नियमांचं प्रत्येकाला पालन करावं लागणार आहे. शिवाय, संघाचा बसचालकही Bio Secure Bubble सोडून जाऊ शकणार नाही. पुढील आठवड्यात बैठक पार पडल्यानंतर प्रत्येक संघमालकांना मार्गदर्शक तत्वे आणि नियम दिले जाणार असून आता सर्वांना याबद्दल कल्पना देण्यात आली आहे. त्यामध्ये काही समस्या असेल तर ते आमच्याशी चर्चा करु शकतात, त्यावर तोडगा काढता येईल., अशी माहिती बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना दिली.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -