घरक्रीडासुनील छेत्री ठरला सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्काराचा मानकरी

सुनील छेत्री ठरला सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्काराचा मानकरी

Subscribe

अखिल भारतीय फुटबॉल महासंघाकडून पुरूष गटात सुनील तर महिला गटात भारतीय फुटबॉल महिला संघाची स्टार खेळाडू कमलादेवीला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे.

भारतीय फुटबॉल संघ आणि बंगळुरू एफसीचा कर्णधार सुनील छेत्री याला अखिल भारतीय फुटबॉल महासंघाकडून २०१७ चा ‘सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. तर महिला गटात कमलादेवी हिला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.


सुनील छेत्री हा भारताचा सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू असून त्याने नुकताच काही दिवसांपूर्वी आपला १०० वा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. भारताकडून १०० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा सुनील दुसरा खेळाडू ठरला असून याआधी बायचुंग भुतियाने ही कामगिरी केली होती. विशेष म्हणजे सुनीलने भारताकडून १०१ सामन्यात ६४ गोल केले आहेत. त्याने नुकत्याच झालेल्या इंटरकॉन्टिनेंटल कपमध्ये अप्रतिम कामगिरी करत ८ गोल केले होते. तो या चषकात सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला. त्याच्या या अप्रतिम कामगिरीमुळे भारताने इंटरकॉन्टिनेंटल कपदेखील जिंकला होता.

- Advertisement -
sunil c
भारतीय फुटबॉल कर्णधार सुनील छेत्री

सुनीलसोबतच भारताचा युवा खेळाडू अनिरुद्ध थापाला ‘मेन इमर्जिंग प्लेअर ऑफ द इयर’ आणि महिला संघाची २१ वर्षीय गोलकिपर खेळाडू पंथोई हिला ‘वुमन इमर्जिंग प्लेअर ऑफ द इयर’च्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्याचसोबत सुमंत दत्ता यांना सहायक रेफ्री पुरस्कार तर सी. आर. कृष्णा यांना सर्वोत्कृष्ट रेफ्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -