घरक्रीडाज्यांच्यामुळे पैसे कमावले त्यांना फक्त ट्रॉफीच? - सुनील गावस्कर

ज्यांच्यामुळे पैसे कमावले त्यांना फक्त ट्रॉफीच? – सुनील गावस्कर

Subscribe

'ज्या खेळाडूंच्या जीवावर आयोजकांनी भरमसाट पैसै कमावले, त्या भारतीय खेळाडूंना रोख इनाम किंना धनादेश दिला नाही हे खटकते', अशी भावना सुनील गावस्कर यांनी व्यक्त केली आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान शुक्रवारी झालेल्या अंतिम सामन्यात भारताने २-१ अशा फरकाने जेतेपदाची ट्रॉफी पटकावली. कसोटीतील या अंतिम निर्णायक सामन्यात महेंद्रसिंग धोनी आणि केदार जाधव यांच्या उत्तम खेळीमुळे भारताने ऑस्ट्रेलियाला ७ गडी राखून पराभूत केले. या विजयाबद्दल भारतीय संघाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असले, तरी माजी कर्णधान सुनील गावस्कर मात्र काहीसे नाराज असल्याचे दिसत आहेत. ‘कसोटीच्या आयोजकांनी विजयानंतर भारतीय संघाला केवळ ट्रॉफी देऊन त्यांची बोळवणी का केली?’, असा सवाल गावस्कर यांनी उपस्थित केला आहे. ‘ज्या खेळाडूंच्या जीवावर आयोजकांनी भरमसाट पैसै कमावले, त्या भारतीय खेळाडूंना रोख इनाम किंना धनादेश दिला नाही हे खटकते’, अशी भावना सुनील गावस्कर यांनी व्यक्त केली आहे. कालच्या सामन्यानंतर महेंद्रसिंग धोनी आणि सामनावीर युझवेन्द्र चहल यांना बक्षीस म्हणून प्रत्येकी ५०० अमेरिकन डॉलर्स म्हणजे साधारण ३५ हजार रुपये इतकाच इनाम देण्यात आला. सोबतच ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू ऍडम गिलख्रिस्टच्या हस्ते विजेत्या भारतीय संघाला एक ट्रॉफी प्रदान करण्यात आली. नेमक्या याच मुद्द्यावर गावस्कर यांनी आपला राग व्यक्त केला आहे.

एका मुलाखती दरम्यान बोलत असताना गावस्कर यांनी याबाबतची आपली नाराजी व्यक्त केली. ‘कसोटी मालिकेच्या या दौऱ्याला जगभरातून खूप प्रसिद्धीम मिळाली. याचाच अर्थ आयोजकांनी हमखास या मालिकेतून प्रायोजकांमार्फच बक्कळ उत्पन्न मिळवले असणार, खूप पैसे कमावले असणार. मग हे उत्त्पन्न आयोजकांनी ज्या खेळांडूच्या जीवावर कमावले आहे त्या खेळाडूंना त्यातील वाटा द्यायला नको का’? असा रोखठोक सवाल गावस्कर यांनी यावेळी केला. मालिकावीर धोनी आणि सामनावीर चहल या दोघांना केवळ ३५ हजार रुपयांचे बक्षीस देणे ही अत्यंत लाजीरवाणी बाब आहे, अशी टीकासुद्धा गावस्कर यांनी यावेळी केली. गावस्कर यांनी बोलतेवेळी २०१८ सालच्या विम्बल्डन स्पर्धेचा दाखला दिला. त्यावेळी विम्बल्डनच्या पहिल्या फेरीत बाद झालेल्या खेळाडूलादेखील ३६ लाख रुपये देण्यात आले होते. मग, क्रिकेटमध्ये विजय प्राप्त केलेल्या भारतीय संघाबाबत ही वागणूक का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

- Advertisement -

‘ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये उत्तम कामगिरी बजावणारा भारतीय संघ नक्कीच रोख रकमेच्या बक्षिसासाठी लायक आहे’, असे ठाम मत गावस्कर यांनी यावेळी व्यक्त केलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -