Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा ऑस्ट्रेलियन्स मला गेट लॉस्ट म्हणाले होते, गावस्करांचा मेलबर्न कसोटीच्या वॉक आऊटवर खुलासा

ऑस्ट्रेलियन्स मला गेट लॉस्ट म्हणाले होते, गावस्करांचा मेलबर्न कसोटीच्या वॉक आऊटवर खुलासा

Related Story

- Advertisement -

भारताचे माजी कॅप्टन सुनिल गावस्कर याने ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील एक कटू आठवण शेअर केली आहे. ऑस्ट्रेलियन दौऱ्यात १९८१ साली मेलबर्न सामन्यात ऑस्ट्रेलियन खेळाडूंकडून मिळालेल्या वागणुकीची आठवण सांगितली आहे. मेलबर्न सामन्यात लेग बिफोर विकेट(एलबीडब्ल्यू) च्या अपिलनंतर आऊट दिल्यावर त्यांनी केलेल्या बंडाची आठवण गावस्कर यांनी सांगितली आहे. एलबीडब्ल्यू अपिल केल्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी त्यांना गेट लॉस्ट असे वारंवार सांगितल्याची आठवण त्यांनी शेअर केली आहे. सुनिल गावस्कर आणि चेतन चौहान यांनी सामन्या दरम्यान अंपायरच्या डिझीजनवर नाराज होत वॉक आऊट केल्याची माहितीही सांगितली.

या १९८१ च्या सामन्यात गावस्कर यांना सुमार पद्धतीने झालेल्या अंपायरींगचा सामना करावा लागला होता. डेनिस लीली या गोलंदाजाने गावस्कर प्लम इन फ्रंट झाल्याची एलबीडब्ल्यूची अपिल केली. या अपिलावर अंपायर रेक्स व्हाईटहेड यांनी आपला हात वर करत त्यांना तत्काळ बाद ठरविले. रेक्स व्हाईटहेड यांचा तो तिसरा सामना होता. पण गावस्कर आऊट झाल्याचे घोषित केल्यानंतरही मैदानात तसेच उभे राहिले. गावस्कर यांच्या बॅटला बॉल लागल्यानेच गावस्कर यांनी मैदान न सोडण्याचा पवित्रा घेतला. बॅटवर बॉल लागूनच मग पॅडवर आदळल्याने त्यांनी अंपायरने दिलेल्या निर्णयाविरोधात मैदान न सोडण्याचा पवित्रा घेतला. बराचवेळ ते मैदानात ठाण मांडून होते. याच बंडामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी त्यांच्यावर गेट लॉस्ट अशी टीका केली.

- Advertisement -

 

- Advertisement -

 

आऊट दिल्यानंतर मी माझ्या सहकाऱ्यानंतर मैदानातून वॉक आऊट करण्याचा निर्णय घेतला होता. अनेक वर्षानंतर हा प्रसंग आठवताना माझा तो निर्णय चुकीचा होता, हे सांगावस वाटते असे गावस्कर यांनी ७क्रिकेटला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. अपिलवर आऊट देण्याचा अंपायरने दिलेला निर्णय हा अतिशय निराशाजनक होता, पण आम्ही दोघांनीही मैदानातून बाहेर पडण्याचा यासाठीच घेतला, कारण जेव्हा मी चेजिंग रूमच्या दिशेने जात होतो तेव्हा ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी मला स्प्रे दिला आणि गेट लॉस्ट अशी खोचक कमेंट केली. त्यामुळेच चिडून पुन्हा मागे आलो आणि माझा सहकारी चेतन चौहानला मैदानातून वॉक ऑफ करायचे असे सांगितले. त्यानंतर डेनिस लीलीनेही कमेंट केली. आम्ही बाऊंड्री रोपच्या ठिकाणी टीम मॅनेजर शहीद दुरानी आणि बापु नाडकर्णी यांना सर्व परिस्थिती सांगितली. माझ्या बॅटला एज लागूनच पॅडवर बॉल आदळल्याचे मी सांगितले. त्यावेळी फॉरवर्ड शॉर्ट लेगच्या खेळाडूनेही हे पाहिले होते. पण त्यानेही काही सांगितले नाही. अंपायरच्या निर्णयानंतर रागाने त्यावेळी मी बॅट पॅड्सवर मारून माझी नाराजी व्यक्त केली होती.

 

- Advertisement -