एकेकाळची ‘ही’ गाजलेली अभिनेत्री आहे सुरेश रैनाची क्रश!

एकेकाळची बॉलिवूडमध्ये गाजलेली अभिनेत्री सुरेश रैनाची क्रश आहे. क्रिकेटर सुरेश रैनाने स्वत:च हा खुलासा केला आहे.

Suresh Raina reveals his crush on bollywood actress Sonali Bendre
एकेकाळची 'ही' गाजलेली अभिनेत्री आहे सुरेश रैनाची क्रश!

बॉलिवूड आणि क्रिकेटमधील संबंध हा अनेक दशके जुना आहे. मन्सूर अली खान पतौडी, मोहम्मद अझरुद्दीन, हरभजन सिंग, युवराज सिंग, विराट कोहली असे काही क्रिकेटपटू आहेत ज्यांनी बॉलिवूड अभिनेत्रींशी लग्न केले आहे. हार्दिक पांड्याचाही नुकताच बॉलवूड अभिनेत्री ‘नतासा स्तनकोविक’ हिच्याशी साखरपुढा पार पडला. भारतीय क्रिकेटमधील जवळजवळ प्रत्येक मोठी नावे अभिनेत्रींशी जोडली गेली आहेत, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. सुरेश रैना मात्र याला अपवाद आहे. सुरेश रैनाचे कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीशी लग्न झाले नाही किंवा कोणत्या अभिनेत्रीशी त्याचा संबंध नव्हता. मात्र एकेकाळची गाजलेली अभिनेत्री सोनाली बेंद्रे ही सुरेश रैनाची क्रश आहे!

कॉलेज काळात सोनाली बेंद्रेसोबत डेटवर जाण्याची इच्छा

एका कार्यक्रमात बोलताना सुरेश रैनाने क्रिकेट, संगीताबद्दलचे प्रेम आणि सेलिब्रिटी क्रश या विषयीचे खुलासे केले आहेत. अभिनेत्री सोनाली बेंद्रे पूर्वीपासून त्याला आवडायची असे तो म्हणतो. एवढेच नाही तर आपल्या कॉलेज काळात तिच्याबरोबर डेटवर जाण्याची इच्छा असल्याचेही त्याने सांगितले. यातच एकदा सोनाली बेंद्रेने सुरेश रैनाला एक मेसेज पाठवला होता, त्यावेळी रैना आश्चर्यचकित झाला असल्याचे तो सांगतो. दरम्यान, त्याने आपल्या ४ वर्षाच्या मुलीबद्दलही सांगितले. “माझी मुलगी माझा सर्वात मोठा आधार आहे. तिच्या येण्याने आमचे आयुष्य बदलले आहे. मी तिच्याबरोबर घालवलेले छोटे छोटे क्षण माझ्यासाठी मौल्यवान आहेत. पहिल्या दिवसापासून ती माझ्या बाजूने आहे. ती माझी ट्रॅव्हल बडी आणि माझी आवडती जिम बडी आहे. ती माझ्याबरोबर आणि पत्नीबरोबर व्यायामही करते”, असं तो यावेळी म्हणाला.

सुरेश रैना करणार पुनरागमन

पुढील महिन्यात सुरेश रैना क्रिकेट सामन्यांमध्ये परतणार आहे. डाव्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे मागील आयपीएल पासून या स्टार फलंदाजाने कोणताही सामना खेळलेला नाही. ऑगस्टमध्ये रैनाने गुडघ्यावर शस्त्रक्रिया केली आणि आता ती पूर्णपणे बरी झाली आहे. येत्या २९ मार्च पासून सुरू होत असलेल्या आयपीएलच्या आगामी हंगामात तो चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना दिसणार आहे.