घरक्रीडाICC कडून टी-२० वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर

ICC कडून टी-२० वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर

Subscribe

२०२० मध्ये ऑस्ट्रेलियात होणार्‍या टी-२० विश्‍वचषकाचे वेळापत्रक जाहीर

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात ICC ने ७ व्या टी-२० विश्‍वचषकाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. पहिल्यांदाच हे टी-२० विश्‍वचषकाचे सामने ऑस्ट्रेलियात खेळले जाणार आहे. ऑस्ट्रेलियामध्ये खेळले जाणारे हे टी-२० सामन्यांची स्पर्धा २४ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर २०२० या कालावधीत पार पडणार आहेत.

विश्‍वचषकांमध्ये १२ संघांचा सहभाग

ऑस्ट्रेलियात होणार्‍या या विश्‍वचषकांमध्ये १२ संघांचा सहभाग असणार असून टी-२० यादीतील तब्बल आठ संघांना थेट एण्ट्री देण्यात आली आहे. उरलेले चार संघ पात्रता फेरी खेळून येतील. यामध्ये बांगलादेश आणि श्रीलंका या संघांचा समावेश असणार आहे.

- Advertisement -

‘सुपर १२’साठी हे संघ पात्र 

‘सुपर १२’साठी पात्र ठरलेल्या संघांची नावे आयसीसीने जाहीर केली असून यामध्ये पाकिस्तान, भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तान संघ सहभागी होणार आहे. दरम्यान, भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ वेगवेगळ्या गटांमध्ये असल्याने दोन्ही संघांमध्ये सामना होणार नाही. मात्र, उपांत्य किंवा अंतिम सामन्यात सामना खेळला जाईल का हे पाहणे नक्की उत्सुकतेचे असणार आहे.

वेळापत्रक

  • ऑक्टोबर २४ : ऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान (सिडनी क्रिकेट ग्राऊंड)
  • ऑक्टोबर २४ : भारत वि. दक्षिण आफ्रिका (पर्थ स्टेडियम)
  • ऑक्टोबर २५ : न्यूझीलंड वि. वेस्ट इंडिज (मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड)
  • ऑक्टोबर २६ : क्वालिफायर १ वि. क्वालिफायर २ (बेलेरिव्ह ओव्हल)
  • ऑक्टोबर २६ : अफगाणिस्तान वि. क्वालिफायर ए २ (पर्थ स्टेडियम)
  • ऑक्टोबर २७ : इंग्लंड वि. क्वालिफायर बी १ (पर्थ स्टेडियम)
  • ऑक्टोबर २७ : न्यूझीलंड वि. क्वालिफायर बी २ (बेलेरिव्ह ओव्हल)
  • ऑक्टोबर २८ : अफगाणिस्तान वि. क्वालिफायर बी १ (पर्थ स्टेडियम)
  • ऑक्टोबर २८ : ऑस्ट्रेलिया वि. वेस्ट इंडिज (पर्थ स्टेडियम)
  • ऑक्टोबर २९ : भारत वि. क्वालिफायर ए २ (मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड)
  • ऑक्टोबर २९ : पाकिस्तान वि. क्वालिफायर ए १ (सिडनी क्रिकेट ग्राऊंड)
  • ऑक्टोबर ३० : इंग्लंड वि. दक्षिण अफ्रिका (सिडनी क्रिकेट ग्राऊंड)
  • ऑक्टोबर ३० : वेस्ट इंडिज वि. क्वालिफायर बी १ (पर्थ स्टेडियम)
  • ऑक्टोबर ३१ : पाकिस्तान वि. न्यूझीलंड (गाबा)
  • ऑक्टोबर ३१ : ऑस्ट्रेलिया वि. क्वालिफायर ए १ (गाबा)
  • नोव्हेंबर १ : भारत वि. इंग्लंड (मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड)
  • नोव्हेंबर १ : दक्षिण अफ्रिका वि. अफगाणिस्तान (अ‍ॅडिलेड ओव्हल)
  • नोव्हेंबर २ : क्वालिफायर ए १ वि. क्वालिफायर बी १ (सिडनी क्रिकेट ग्राऊंड)
  • नोव्हेंबर २ : न्यूझीलंड वि. क्वालिफायर ए १ (गाबा)
  • नोव्हेंबर ३ : पाकिस्तान वि. वेस्ट इंडिज (अ‍ॅडिलेड ओव्हल)
  • नोव्हेंबर ३ : ऑस्ट्रेलिया वि. क्वालिफायर बी २ (अ‍ॅडिलेड ओव्हल)
  • नोव्हेंबर ४ : इंग्लंड वि. अफगाणिस्तान (गाबा)
  • नोव्हेंबर ५ : दक्षिण अफ्रिका वि. क्वालिफायर ए २ (अ‍ॅडिलेड ओव्हल)
  • नोव्हेंबर ५ : भारत वि. क्वालिफायर बी १ (अ‍ॅडिलेड ओव्हल)
  • नोव्हेंबर ६ : पाकिस्तान वि. क्वालिफायर बी २ (मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड)
  • नोव्हेंबर ६ : ऑस्ट्रेलिया वि. न्यूझीलंड (मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड)
  • नोव्हेंबर ७ : वेस्ट इंडिज वि. क्वालिफायर ए १ (मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड)
  • नोव्हेंबर ७ : इंग्लंड वि. क्वालिफायर ए २ (अ‍ॅडिलेड ओव्हल)
  • नोव्हेंबर ८ : दक्षिण अफ्रिका वि. क्वालिफायर बी १ (सिडनी क्रिकेट ग्राऊंड)
  • नोव्हेंबर ८ : भारत वि. अफगाणिस्तान (सिडनी क्रिकेट ग्राऊंड)

उपांत्य सामना

  • नोव्हेंबर ११ : पहिला उपांत्य सामना (सिडनी क्रिकेट ग्राऊंड)
  • नोव्हेंबर १२ : दुसरा उपांत्य सामना (अ‍ॅडिलेड ओव्हल)

अंतिम सामना

  • नोव्हेंबर १५ : अंतिम सामना (मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड)
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -