घरक्रीडाटी-२० वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर

टी-२० वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर

Subscribe

आयसीसीचं ठरलं

वर्ल्डकप स्पर्धेचा समारोप झाल्यानंतर काही तासांनी आयसीसीने 2020 साली होणार्‍या सातव्या टी-20 वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ही स्पर्धा पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियामध्ये खेळवण्यात येणार असून पाच आठवडे चालणार आहे. 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर 2020 या काळात स्पर्धेचा थरार रंगणार आहे. आयसीसीने सुपर12 संघांची घोषणा केली असून यामध्ये पाकिस्तान, भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तान या आठ संघाचा समावेश आहे. तर 2019 मध्ये होणार्‍या पात्रता फेरीतून ‘टॉप’चे 4 संघ निवडले जाणार आहेत. विशेष म्हणजे या स्पर्धेत गतविजेते आणि तीन वेळा उपविजेत्याचा मान मिळालेल्या श्रीलंकेला साखळी सामन्यात प्रवेश मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. तसेच बांगलादेश संघालाही साखळी सामन्यात प्रवेशासाठी झगडावे लागणार आहे. श्रीलंका आणि बांगलादेश यांना कमी गुणांमुळे टी 20 विश्वकरंडक स्पर्धेच्या सुपर12 संघात स्थान मिळालेले नाही. यामुळे त्यांना 12 संघात स्थान मिळवण्यासाठी ग्रुप स्टेजमध्ये भाग घ्यावा लागणार आहे.

असे असतील ग्रूप

ग्रूप 1 – पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, ग्रुप अ विजेता, ग्रुप ब उप-विजेता
ग्रुप 2 – भारत, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, ग्रुप अ उप-विजेता, ग्रुप ब विजेता

- Advertisement -

भारताचे सामने :

ऑक्टोबर 24- भारत vs दक्षिण अफ्रीका (पर्थ स्टेडियम)
ऑक्टोबर 29 – भारत vs क्वालिफायर ए-२ (मेलबर्न क्रिकेट मैदान)
नोव्हेंबर 1- भारत vs इंग्लंड (मेलबर्न क्रिकेट मैदान)
नोव्हेंबर 5 – भारत vs क्वालिफायर बी1 (अ‍ॅडिलेड ओव्हल)
नोव्हेंबर 8 – भारत vs अफगाणिस्तान (सिडनी क्रिकेट मैदान)

सेमीफायनल सामने –

नोव्हेंबर 11 – पहिली सेमीफायनल (सिडनी क्रिकेट मैदान)
नोव्हेंबर 12 – दुसरी सेमीफाइनल (एडिलेड ओव्हल)
अंतिम सामना- 15 नोव्हेंबर (मेलबर्न)

- Advertisement -

पात्रता फेरीतील संघ- श्रीलंका, बांग्लादेश, स्कॉटलँड, झिम्बाब्वे, नेदरलँड, हाँगकाँग, ओमान, आर्यंलंड आणि संयुक्त अरब अमिरात, नेपाळ या संघामध्ये पात्रता फेरी खेळवण्यात येणार आहे. यातून पहिले टॉपचे चार संघ अंतिम स्पर्धेसाठी पात्र ठरतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -