घरक्रीडाIND vs AUS : उमेश यादव अखेरच्या दोन कसोटींना मुकणार; नटराजन संघात 

IND vs AUS : उमेश यादव अखेरच्या दोन कसोटींना मुकणार; नटराजन संघात 

Subscribe

दुखापत झाल्याने उमेशला अखेरच्या दोन कसोटीत खेळता येणार नाही.

‘यॉर्कर सेन्सेशन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टी. नटराजनची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत वेगवान गोलंदाज उमेश यादवला दुखापत झाल्याने त्याला अखेरच्या दोन कसोटीत खेळता येणार नाही. त्याच्या जागी डावखुऱ्या नटराजनचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. त्याआधी मोहम्मद शमीच्या जागी मुंबईकर शार्दूल ठाकूरची संघात निवड झाली होती.

बॉर्डर-गावस्कर मालिकेतील मेलबर्नला झालेल्या दुसऱ्या कसोटीत उमेश यादवच्या पायाला दुखापत झाली होती. अखेरच्या दोन कसोटी सामन्यांपूर्वी तो पूर्णपणे फिट होऊ शकणार नाही. त्यामुळे त्याला या मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे. अखिल भारतीय सिनियर निवड समितीने यादवच्या जागी नटराजनची संघात निवड केली आहे. तसेच बॉक्सिंग-डे कसोटीच्या आधी मोहम्मद शमीच्या जागी शार्दूल ठाकूरला भारतीय संघात स्थान देण्यात आले होते, असे बीसीसीआयने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात सचिव जय शाह यांनी सांगितले.

- Advertisement -

नटराजनने आयपीएल आणि स्थानिक स्पर्धांमध्ये केलेल्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर भारतीय संघात प्रवेश मिळवला. त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील अखेरच्या एकदिवसीय सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर झालेल्या टी-२० मालिकेच्या तीन सामन्यांत सहा विकेट घेत त्याने सर्वांनाच प्रभावित केले. त्यामुळे कसोटी मालिकेसाठी त्याला नेट्समध्ये गोलंदाजी करण्यास ऑस्ट्रेलियात थांबवण्यात आले. आता त्याची कसोटी संघात निवड झाली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -