घरक्रीडानाशिकची सायली वाणी विजेती

नाशिकची सायली वाणी विजेती

Subscribe

टॅलेंट हंट नॅशनल टेबल टेनिस

क्रीडा मंत्रालय आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने मध्य प्रदेश टेबल टेनिस संघटनेच्या वतीने झालेल्या टॅलेंट हंट राष्ट्रीय नॅशनल टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत नाशिकच्या सायली वाणीने बाजी मारली. इंदूर येथे झालेल्या १३ ते १५ वयोगटातील या राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत सायलीने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना सुवर्ण कामगिरी केली.

सातव्या सीडेड सायलीने मुलींच्या उपांत्यपूर्व फेरीत तामिळनाडूच्या एस. एकनाटिकावर ११-४, ११-३, ११-७, ११-३ अशी, तर उपांत्य फेरीत दिल्लीच्या माणिक केसरवर ११-४, ११-४, ११-६, ११-५ अशी मात करत अंतिम फेरी गाठली. या फेरीत तिने बंगालच्या संप्रती रॉयचा ११-५, ११-३, ११-८, १३-११ असा पराभव करून जेतेपद पटकावले. बँक ऑफ इंडिया इंदूर विभागचे विभागीय व्यवस्थापक सुबोधकुमार यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना सन्मानित करण्यात आले.

- Advertisement -

मध्य प्रदेश टेबल टेनिस संघटनेचे आजीवन अध्यक्ष पद्मश्री अभय छजलानी, अध्यक्ष नरेंद्र कौशिक, मध्य प्रदेश ऑलिम्पिक असोसिएशनचे उपाध्यक्ष ओम सोनी, स्पर्धा संचालक जयेश आचार्य आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

सायलीच्या या यशाबद्दल नासिक जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, सचिव शेखर भंडारी, राजेश भरवीरकर, मिलींद काचोळे, अभिषेक छाजेड, जय मोडक, अजिंक्य शिंत्रे, राज्य संघटनेचे अध्यक्ष राजीव बोडस, प्रकाश तुळपुळे, यतीन टिपणीस, प्रकाश जसानी, आशुतोष पोतनीस आदींनी तिचे अभिनंदन केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -