घरक्रीडाIND vs AUS पर्थ कसोटी : रोहित, अश्विनला संघात स्थान नाही

IND vs AUS पर्थ कसोटी : रोहित, अश्विनला संघात स्थान नाही

Subscribe

दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून रोहित शर्मा आणि आर. अश्विनला वगळण्यात आले आहे.

पहिल्या कसोटीत भारतानं ऑस्ट्रेलियाचा ३१ धावांनी पराभव केला. त्यानंतर आात दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून रोहित शर्मा आणि आर. अश्विनला वगळण्यात आले आहे. तर, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार आणि उमेश यादव या तिघांचा संघात समावेश करण्यात आला आहे. पहिल्या कसोटीमध्ये रोहित शर्माला साजेशी खेळी करता आली नव्हती. शेवटच्या दिवशी अश्विनची फिरकी देखील प्रभावी दिसली नव्हती. बुमराह, इशांत शर्मा, उमेश आणि भुवनेश्वरसह एक फिरकी बॉलर असण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे ११ जणांच्या टीममध्ये आता कुणाची वर्णी लागते हे पाहावं लागणार आहे. पहिल्या विजयामुळे भारतीय संघानं चार कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये १ – ० अशी आघाडी घेतली आहे. पर्थ स्टेडियमवरती दुसरा कसोटी सामना रंगणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -