घरक्रीडाटीम इंडियाच सर्वोत्तम!

टीम इंडियाच सर्वोत्तम!

Subscribe

भारतीय संघाने इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या क्रिकेट विश्वचषकाची चांगली सुरुवात केली आहे. हा संघ अजूनही अपराजित असून त्यांनी दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान या बलाढ्य संघांचा पराभव केला आहे. मात्र, भारताचा दुखापतींनी पिच्छा पुरवला आहे.

सलामीवीर शिखर धवन अंगठ्याच्या दुखापतीमुळे उर्वरित स्पर्धेला मुकणार आहे, तर मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या डाव्या पायाला दुखापत झाल्यामुळे तो काही सामन्यांत खेळू शकणार नाही. मात्र, याचा भारतीय संघावर फारसा परिणाम होणार नाही असे भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला वाटते. तसेच या संघाने आतापर्यंत सर्वोत्तम कामगिरी केली असून हा संघ उपांत्य फेरी गाठणार याची गांगुलीला खात्री आहे.

- Advertisement -

धवन आणि भुवनेश्वरला दुखापत होणे ही भारतीय संघाच्या दृष्टीने चांगली गोष्ट नाही. मला आशा आहे की धवन लवकर बरा होईल. मात्र, भारतीय संघाने मागील सामन्यात पाकिस्तानचा अगदी सहज पराभव केला. त्यामुळे हा संघ चांगल्या फॉर्मात आहे. दुखापती या खेळाचा भाग आहेत. त्याबाबत तुम्ही काहीही करू शकत नाही. मात्र, या खेळाडूंच्या अनुपस्थितीत इतर खेळाडूंना संधी मिळणार आहे. त्यांनी या संधीचा पुरेपूर वापर केला पाहिजे. मागील सामन्यात भुवनेश्वरला दुखापत झाल्यानंतर विजय शंकरने अप्रतिम प्रदर्शन केले.

भारताचा संघाने आतापर्यंत या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी केली आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांचे प्रदर्शनही चांगले आहे. मात्र, भारताचा संघ खूपच उत्कृष्ट आहे आणि हा संघ किमान उपांत्य गाठणार याची मला खात्री आहे. त्यानंतर काय होईल हे सांगता येणे अवघड आहे, असे गांगुली म्हणाला. भारताचा यापुढील सामना शनिवारी अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -