घरक्रीडाआजपासून पहिल्या कसोटीला सुरुवात; भारतीय संघ सज्ज

आजपासून पहिल्या कसोटीला सुरुवात; भारतीय संघ सज्ज

Subscribe

दोन सामन्यांची मालिका आजपासून सुरू; वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघ सज्ज

पुढील दोन वर्षे चालणार्‍या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप क्रिकेट स्पर्धेसाठी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ तय्यार झाला आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध आजपासून सुरू होत असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या कामगिरीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप क्रिकेट या स्पर्धेअंतर्गत पहिली कसोटी मालिका वेस्ट इंडिजविरुद्ध खेळली जाणार आहे. टी २० आणि एकदिवसीय सामन्यांची मालिका जिंकल्यानंतर कसोटी मालिका जिंकून दौऱ्याचा शेवट यशस्वी करण्याकरिता भारतीय संघ मैदानात उतरणार आहे.

आजची मालिका कशी रंगणार याची उत्सुकता शिगेला

भारतीय संघाची वेस्ट इंडिजविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका गुरुवारपासून सुरू होत आहे. याआधी झालेल्या तीन दिवसीय सरावाच्या सामन्यांत भारतीय संघाने आपले वर्चस्व राखले होते. त्यामुळे आज होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्ध आजपासून सुरू होत असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघातील चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, ईशांत शर्मा, उमेश यादव यांसारख्या खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष लागले असून या मालिकेकरिता आम्ही सज्ज आहोत असे संकेत दिले आहे. त्यामुळे या आजची मालिका कशी रंगणार याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – विक्रमी विराट करणार पॉन्टिंगशी बरोबरी?

जर भारताने पहिला कसोटी सामना जिंकल्यास कर्णधार म्हणून विराट कोहलीचा २७ वा विजय ठरेल. यासोबतच माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने केलेल्या विक्रमाची बरोबरी करेल. यासोबतच या कसोटी सामन्यात विराटचे शतक निश्चित झाल्यास कर्णधार म्हणून ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगच्या १९ शतकांशी त्याला बरोबरी करता येईल. विराटबरोबरच या सामन्यात भारतीय संघाची रचना तसेच खेळी कशी असेल, याचीही उत्सुकता असणार आहे.

भारत वि. वेस्ट इंडिज 

वेळ : सायं. ७ पासून

- Advertisement -

असा असणार संभाव्य संघ

भारत 

विराट कोहली (कर्णधार), मयंक अग्रवाल, के.एल. राहुल, चेतेश्‍वर पुजारा, हनुमा विहारी, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, ऋषभ पंत, कुलदीप यादव, रविचंद्रन अश्‍विन, रवींद्र जडेजा, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, भुवनेश्‍वर कुमार, ऋद्धिमान साहा.

वेस्ट इंडिज 

जेसन होल्डर (कर्णधार) क्रेग ब्रेथवेट, डॅरेन ब्राव्हो, शामार ब्रूक्स, जॉन कॅम्पबेल, रोस्टन चेस, रकहीम कार्नवाल, शेन डोरिच, शॅनोन गॅब्रियल, शिमरोन हेटमायेर, शाई होप, कीमो पॉल, केमार रोच.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -