घरक्रीडाऑस्ट्रेलियात डे-नाईट कसोटी खेळण्यास टीम इंडिया तयार!

ऑस्ट्रेलियात डे-नाईट कसोटी खेळण्यास टीम इंडिया तयार!

Subscribe

सौरव गांगुलीची माहिती

भारतीय संघ यावर्षीच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर जाणार आहे. या दौर्‍यात भारत आणि ऑस्ट्रेलिया या बलाढ्य संघात चार सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेत किमान एक डे-नाईट कसोटी सामना खेळवण्यास क्रिकेट ऑस्ट्रेलिया उत्सुक होते. आता भारतीय संघाने यासाठी तयारी दर्शवली आहे.

भारतीय संघ ऑस्ट्रेलियामध्ये डे-नाईट कसोटी खेळणार असून याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येईल, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली रविवारी म्हणाला. प्रत्येक कसोटी मालिकेत किमान एक डे-नाईट सामना व्हावा यासाठी बीसीसीआय प्रयत्नशील आहे. त्यामुळे घरच्या मैदानावर होणार्‍या इंग्लंडविरुद्धच्या पुढील मालिकेतील दुसरी कसोटी डे-नाईट असेल अशीही माहिती गांगुलीने दिली.

- Advertisement -

भारतीय संघाने अनेक वर्षे डे-नाईट कसोटी सामना खेळण्यास नकार दिला होता. मात्र, गांगुली अध्यक्ष झाल्यानंतर बीसीसीआयच्या विचारसरणीत बदल झाला. त्याने कर्णधार विराट कोहलीला गुलाबी चेंडूने होणारा हा सामना खेळण्यास तयार केले. त्यामुळे मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये बांगलादेशविरुद्ध भारताने आपला पहिलावाहिला डे-नाईट कसोटी सामना खेळला. हा सामना एडन गार्डन्स येथे झाला. भारताने हा सामना केवळ तीन दिवसांतच जिंकला. या सामन्यानंतर आम्ही कोणत्याही ठिकाणी डे-नाईट खेळण्यास तयार आहोत असे कर्णधार कोहलीने नमूद केले होते.

आव्हानासाठी सज्ज – कोहली
भारतीय संघ मागील महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळला. या मालिकेतील पहिल्या सामन्याच्या पूर्वसंध्येला भारताचा कर्णधार विराट कोहलीला ऑस्ट्रेलियामध्ये डे-नाईट कसोटी खेळण्याबाबत विचारण्यात आले. तो म्हणाला, आम्ही या आव्हानासाठी तयार आहोत. हा सामना गॅबा (ब्रिस्बन) किंवा पर्थमध्ये होते याने काहीही फरक पडत नाही. आमची ऑस्ट्रेलियामध्ये डे-नाईट कसोटी सामना खेळण्याची तयारी आहे. या सामन्यांमुळे कसोटी क्रिकेट अजून रंगतदार झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -