भारताचा फिरकीपटू प्रग्यान ओझाने जाहीर केली निवृत्ती

माझ्या आयुष्यातील आता पुढील टप्याचा प्रवास करण्याची वेळ आली आहे. प्रेम आणि समर्थन देणारा प्रत्येक व्यक्ती माझ्या कायम लक्षात राहिल आणि मला यातून कायम उर्जा मिळत राहिल' असे त्याने ट्विटरद्वारे म्हटले आहे.

Mumbai
pragyan ojha team india spinner announces retirement from cricket

भारतीय क्रिकेट संघातील एक नावाजलेला फिरकीपटू प्रग्यान ओझा याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. ओझाने स्वत:हून याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. तसेच प्रग्यानने व्यावसायिक क्रिकेटच्या तीनही प्रकारांमधून निवृत्ती घेत असल्याचे सांगितले आहे. ट्विटरच्या माध्यमातून दोन पानांचे पत्र शेअर करत याची माहिती त्याने दिली आहे.

 

ओझाने ट्वीट करून सांगितले आहे की, ‘माझ्या आयुष्यातील आता पुढील टप्याचा प्रवास करण्याची वेळ आली आहे. प्रेम आणि समर्थन देणारी प्रत्येक व्यक्ती माझ्या कायम लक्षात राहील आणि मला यातून कायम उर्जा मिळत राहील’, असे त्याने म्हटले आहे. तसेच त्याने माजी कर्णधारांचे आणि सहकाऱ्यांचे देखील आभार मानले आहेत.

कसा होता ओझाचा प्रवास

ओझाने २००८ साली भारतीय क्रिकेट संघात पदार्पण केले होते, ओझाने अल्पकाळ भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. ओझाने भारतीय संघाकडून २४ कसोटी, १८ वनडे तर ६ टी-२० सामने खेळले आहेत. फलंदाजीमध्ये ओझाने कसोटीत ८९, वनडेमध्ये ४६ तर टी -२० मध्ये १० धावा त्याने केल्या आहेत. ओझाने २०१३ साली भारतीय संघाकडून खेळलेला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना होता. त्यानंतर पुढे २०१९ पर्यंत त्याने देशांतर्गत चालणाऱ्या क्रिकेट स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. मात्र आज त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटला अलविदा म्हटलं आहे.