घरक्रीडाविश्वचषकासाठी संघ निवड

विश्वचषकासाठी संघ निवड

Subscribe

फिरकीपटू अकिला धनंजया आणि माजी कर्णधार दिनेश चंडिमल यांची विश्वचषकासाठी श्रीलंकेच्या संघात निवड झाली नाही, तर २०१७ नंतर एकही एकदिवसीय सामना न खेळलेल्या फलंदाज लाहिरू थिरिमाने, अष्टपैलू मिलिंडा सिरीवर्धने, जीवन मेंडिस आणि लेगस्पिनर जेफ्री वॅनडर्से यांना मात्र या संघात स्थान मिळाले आहे. बुधवारीच श्रीलंकेने दिमुथ करुणारत्नेची एकदिवसीय संघाचा कर्णधार म्हणून निवड केली होती. करुणारत्नेने आपला अखेरचा एकदिवसीय सामना २०१५ मध्ये खेळला आहे. धनंजया आणि चंडिमलप्रमाणेच निरोशन डिकवेला, दनुष्का गुणतिलका आणि उपुल थरांगा यांचीही विश्वचषकासाठी निवड झालेली नाही.

श्रीलंकेला मागील काळात एकदिवसीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करण्यात अपयश आले आहे. त्यामुळेच श्रीलंकन बोर्डाकडून करुणारत्नेला कर्णधारपद देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. करुणारत्नेच्या नेतृत्त्वातच दोन महिन्यांपूर्वी श्रीलंकेने द.आफ्रिकेत पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रम केला होता. त्यामुळे त्याच्या नेतृत्त्वात श्रीलंकन संघ विश्वचषकातही चांगले प्रदर्शन करेल, अशी श्रीलंकन क्रिकेट बोर्डाला आशा आहे.

- Advertisement -

श्रीलंकन संघ – दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), आविष्का फर्नांडो, लाहिरू थिरिमाने, कुशल मेंडिस, कुशल परेरा (यष्टीरक्षक), अँजेलो मॅथ्यूज, धनंजय डीसिल्वा, थिसारा परेरा, इसुरु उदाना, जेफ्री वॅनडर्से, जीवन मेंडिस, मिलिंडा सिरीवर्धने, लसिथ मलिंगा, सुरंगा लकमल, नुवान प्रदीप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -