कुस्ती स्पर्धेत अमरावतीच्या तेजस्वी दहीकरने मारली बाजी

चांदूर रेल्वे येथील जय हिंद क्रीडा प्रसारक मंडळाच्या वतीने स्थानिक स्व. मदनगोपाल मुंधडा महाविद्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रीय दर्जाच्या कुस्तीच्या सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी झालेल्या चुरशीच्या सामन्यात महिलांमध्ये अमरावतीच्या तेजस्विनी दहीकर तर पुरुषांमध्ये कोल्हापुरचा आगरकर हे विजयी ठरलेत.

Amravati
poltics-kushti
प्रातिनिधिक फोटो

अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील जय हिंद क्रीडा प्रसारक मंडळाच्या वतीने स्थानिक स्व. मदनगोपाल मुंधडा महाविद्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रीय दर्जाच्या कुस्तीच्या सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी झालेल्या चुरशीच्या सामन्यात महिलांमध्ये अमरावतीच्या तेजस्विनी दहीकर तर पुरुषांमध्ये कोल्हापुरचा आगरकर हे विजयी ठरलेत. राष्ट्रीय दर्जाची मातीवरील कुस्ती दंगल अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वेत प्रथमच आयोजित करण्यात आल्या होत्या. त्या निमित्ताने चांदूर रेल्वे शहरात देशातील नामांकित पुरुष – महिला पहिलवान प्रत्यक्ष झुंजताना नामी संधी शहरवासीयांना मिळाली होती. सदर स्पर्धा कुमार गट, महिला गट व पुरुष गट या तीन गटात आयोजित करण्यात आल्या होत्या. रविवारी रात्री झालेल्या महिलांचा अंतिम सामना हा राष्ट्रीय महिला पहेलवान असलेल्या अमरावतीच्या तेजस्विनी दहीकर व नागपूर येथील निकिता लांजेवार त्यांच्यात खेळला गेला.

विविध राज्यांतून आलेले खेळाडू

अत्यंत चुरशीच्या या सामन्यात अमरावतीच्या तेजस्विनी हिने नागपूरच्या निकिताचा ६-३ असा पराभव करीत विजय संपादन केला. या सामन्याला चांदुर रेल्वे सह आजूबाजूच्या परिसरतील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली होती. दोन दिवस चाललेल्या या दंगलीत देशातील हरियाणा, विदर्भ, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली येथील नामांकित पुरुष व महिला पहिलवान सहभागी झाले होते. हि दंगल पुरुष, महिला व कुमार अशा तीन विविध वजनगटासाठी खेळविण्यात आल्यात तर या दंगलीत एकूण १० लाख रुपयांचे रोख पुरस्कार मंडळाच्या वतीने देण्यात आले. स्पर्धेचे प्रमुख आकर्षण असलेल्या हिंद केसरी हरियाणाचा युद्धवीर व राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता पहिलवान प्रवीण कुमार भोला या दोन मल्लांमधील कुस्तीत प्रवीण भोला यांनी हरियाणाच्या युद्धवीरला पराजित केले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here