‘मी पाकिस्तान संघाची आई नाही’, पाक अभिनेत्रीला सानियाचे चोख उत्तर

Mumbai

विश्वचषक २०१९ भारत आणि पाकिस्तानच्या सामन्यात पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळाला. हे अपयश पाकिस्तान क्रिकेट चाहत्यांच्या जिव्हारी लागले आहे. टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाक क्रिकेटपटू शोएब मलिक यांच्यावर सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडूनजोरदार टीका सुरू आहे. या टीकेला सानियानेही तोडीस-तोड उत्तर दिले आहे.

पाक अभिनेत्रीच्या ट्विटवर भडकली सानिया

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. भारत-पाक सामन्यांनंतर शनिवारच्या रात्री इंग्लडमध्ये डिनर करता सानिया तिचा पती शोएब आणि मुलासह एका रेस्ट्रारंटमध्ये गेली होती. त्याच्या दुसऱ्या दिवशी भारताशी सामना रंगणार होता. यावर पाकिस्तानी अभिनेत्री वीणाने, ”मला तुमच्यासोबत गेलेल्या मुलांची भीती वाटत आहे. तुम्ही शीशा नाईट क्लबमध्ये तुमच्या मुलांना घेऊन गेलात ? माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही ज्या क्लबमध्ये गेलात तिथं जंक फुड असतं, ते खेळाडूंसाठी योग्य आहे का? तु स्वत: एक आई आणि खेळाडू आहे, तुला हे माहित पाहिजे”, असे ट्विट केले. हे ट्विट केल्याने सानिया मिर्झा आणि विणा मलिक यांच्यात वाद निर्माण झाले आहे.

हे ही वाचा – जावईबापू शून्यावर बाद! शोएब मलिक सोशल मीडियावर ट्रोल

यावेळी सानियाच्या मुलाच्या आरोग्याबद्दल चिंता व्यक्त करत खोचकपणे कमेंट करत वीणाने सानिया मिर्झावर निशाणा साधला आहे. यावर विना मलिकला सानियाने देखील चोख उत्तर दिले आहे.

“वीणा, मी माझ्या मुलाला तिकडे घेऊन गेले नव्हते. मी माझ्या कुटुंबियांसोबत कुठे जायचं आणि कुठे नाही, हा निर्णय आमचा आहे. मला माझ्या मुलाची तुमच्या सर्वांपेक्षा जास्त काळजी आहे” त्यानंतर तिनं खोचकपणे, “मी पाकिस्तान क्रिकेट संघाची आई किंवा शिक्षिका नाही”. भारताविरुद्ध सामना हरल्यानंतर पाकिस्तानच्या चाहत्यांनी क्रिकेटपटूंवर जोरदार टीका केली.

भारताविरुद्धच्या सामन्यात शोएब मलिकची शून्यावर दांडी गूल झाल्य़ाने शोएब आणि पाकिस्तान संघाच्या खराब कामगिरीसाठी रात्री झालेली पार्टी जवाबदार असल्याचा आरोप पाकिस्तानच्या क्रिकेट चाहत्यांनी केला आहे. त्याचा एक व्हिडिओही वायरल होत आहे.

शोएब मलिकला शुन्यावर बाद झाल्याने नेटकऱ्यांनी केले ट्रोल

या दरम्यान विश्वचषकातील भारताविरुद्धच्या सामन्यात पाकच्या पराभवामुळे पाकिस्तानी संघातील शोएब मलिकला शुन्यावर बाद झाल्याने त्याला नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले होते. विणा मलिकला चोख उत्तर देत सानिया मिर्झा नेटकऱ्यांवर देखील चांगलीच भडकलेली दिसते.

शोएबने आता क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारावी असाही सूर पाकच्या क्रिकेट चाहत्यांनी लावला आहे. शोएब मलिकवर होणारी टीका सानिया मिर्झाला असाह्य झाली. तिनेही काही नेटकऱ्यांनी चोख उत्तर दिले. आमच्यासोबत एक लहान मुलगा असताना, आमच्या खासगी क्षणांचा व्हिडिओ काढला. त्यासाठी आमची परवानगीदेखील घेतली नाही आणि तुम्हाला अडवल्यानंतर तुम्ही असा अपप्रचार करायला लागलात? असा प्रतिप्रश्न सानियाने उपस्थित केला आहे.