घरक्रीडानवी मुंबई, जॉयकुमार स्पोर्ट्स पाचव्या फेरीत

नवी मुंबई, जॉयकुमार स्पोर्ट्स पाचव्या फेरीत

Subscribe

ठाणे जिल्हा निवड चाचणी कबड्डी

नवी मुंबई, जॉयकुमार स्पोर्ट्स, उजाला मंडळ, नागेश्वर हेल्थ या संघांनी ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन आयोजित जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या स्थानिक द्वितीय श्रेणी पुरुषांची पाचवी फेरी गाठली. ठाणे येथे सुरु असलेल्या या स्पर्धेतील द्वितीय श्रेणी पुरुषांच्या चौथ्या फेरीत उजाला क्रीडा मंडळाने मध्यंतरातील ४-७ अशी ३ गुणांची पिछाडी भरून काढत विश्वरूप मंडळाला २१-२० असे पराभूत करत आगेकूच केली. उजालाच्या अक्षय भोईर, विक्रांत पाटील यांनी अप्रतिम खेळ करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

नवी मुंबई महानगरपालिकेने अनिकेत स्पोर्ट्सवर २४-२२ अशी मात केली. या सामन्याच्या मध्यंतराला नवी मुंबईचा संघ ८-१३ असा पिछाडीवर होता. मात्र, उत्तरार्धात त्यांनी दमदार पुनरागमन करत हा सामना २ गुणांच्या फरकाने जिंकला. सागर साळुंखे, अनिकेत तिवारी हे खेळाडू नवी मुंबईच्या विजयात चमकले. नागेश्वर हेल्थ सेंटरने बळीराम क्रीडा मंडळाचा प्रतिकार २०-११ असा मोडून काढला. नागेश्वरच्या राजेश शिंदे, रुपेश गायकवाड यांनी चढाई- पकडीत चांगला खेळ केला. जॉयकुमार स्पोर्ट्सने पहिल्या डावातील ६-१२ अशा पिछाडीवरून नवं तरुण मंडळाचा पूर्ण डावात २२-१८ असा पराभव करत आगेकूच केली. खंडोबा क्रीडा मंडळाने सुदर्शन मंडळाला १५-११ असे नमवले. व्यावसायिक पुरुषांच्या उपउपांत्यपूर्व सामन्यात जॉयकुमार युवा प्रतिष्ठानने ५-५ चढायांच्या डावात हिंदवी सेवा प्रतिष्ठानचे आव्हान ३०-२९ (७-६) असे मोडीत काढले.

- Advertisement -

पुरुष व्दितीय श्रेणी चौथी फेरी इतर निकाल : १) महाकाली मंडळ विजयी वि. गावदेवी मंडळ (१५-१३); २) रामकृष्ण प्रतिष्ठान विजयी वि. जय बजरंग (२०-१०); ३) लव लाईन विजयी वि. रॉड्रीकल (१८-१०).

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -