घरक्रीडाचुकीला माफी नाही...

चुकीला माफी नाही…

Subscribe

225 कोटींच्या सट्ट्याप्रकरणी बीसीसीआय चौकशी करणार

गेल्या महिन्याभरात सट्टेबाजीच्या अनेक घटना समोर आल्या असून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय) भ्रष्टाचार विरोधी पथकानेंही चौकशीचा धडाका लावला आहे. एका वृत्तानुसार तामिळनाडू प्रीमिअर लीगच्या एका सामन्यावर 225 कोटींचा सट्टा लागल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाच्या एका अहवालानुसार तामिळनाडू प्रीमिअर लीगच्या एका सामन्यात 225 कोटींचा सट्टा लागला आहे. तुती पायरट्स आणि मधुराई पँथर्स यांच्यातील सामन्यावर हा सट्टा लागला आहे.

सट्टा लावणार्‍या आंतरराष्ट्रीय संकेतस्थळ बेटफेअरवर हा सट्टा लावण्यात आल्याचे समजते. त्यावरून पथकाने बीसीसीआयला अशा लीगवर बंदी घालण्यात यावी, यावर विचार करण्यात यावा असे सांगितले आहे. परंतु, तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनच्या अधिकार्‍यांनी बेटींग झाली नसल्याचे सांगितले आहे. पण, या लीगमधील तुती पायरट्स संघाच्या दोन सह मालकांवर भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे निलंबनाची कारवाई झाली आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष आणि माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी सट्टेबाजीचे प्रकार खपवून घेतले जाणार नाही आणि ताकीद दिल्यानंतरही तसा प्रयत्न कोण करत असेल, तर ती लीग रद्द करण्यात येईल, असेही स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

याआधीही कारवाई

याआधी कर्नाटक प्रीमिअर लीगमध्येही (केपीएल) काही खेळाडू आणि बुकींना अटक करण्यात आली आहेत. या लीगमधील सामन्यात मॅच फिक्सिंग केल्याप्रकरणी आणखी दोन खेळाडूंना सीबीआयच्या बेंगळुरूतील पथकाने अटक केली होती. बंगळुरूमध्ये याआधी भारतीय क्रिकेटपटू निशांत सिंह शेखावत याला सट्टेबाजीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. यानंतर केपीएलमध्ये बेल्लारी टस्कर्सकडून खेळणार्‍या कर्णधार सीएम गौतम आणि अबरार काझी यांनी 2019 च्या केपीएलमध्ये अंतिम सामन्यात स्पॉट फिक्सिंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली असल्याचे समोर आले आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -