घरक्रीडाभारतीय संघाची कामगिरी उत्कृष्ट - सी.के.खन्ना

भारतीय संघाची कामगिरी उत्कृष्ट – सी.के.खन्ना

Subscribe

उपांत्य फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले असले, तरी भारतीय संघाने या विश्वचषकात उत्कृष्ट कामगिरी केली, असे विधान (बीसीसीआय) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सी. के. खन्ना यांनी केले आहे. भारतीय संघाने या विश्वचषकाच्या साखळी सामन्यांमध्ये अप्रतिम कामगिरी केली.

त्यांना ९ पैकी ७ सामने जिंकण्यात यश आले, तर केवळ यजमान इंग्लंडने त्यांचा पराभव केला. त्यामुळे साखळी सामन्यांच्या अखेरीस भारत १५ गुणांसह अव्वल स्थानी होता. मात्र, उपांत्य फेरीत न्यूझीलंडने त्यांच्यावर १८ धावांनी मात केली.

- Advertisement -

उपांत्य फेरीचा सामना अवघड होता आणि आमच्या खेळाडूंनी आपला सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न केला. कोणत्याही संघाला पराभूत होणे आवडत नाही. या सामन्यात सर्व खेळाडूंनी भारताला सामना जिंकवून देण्याचा प्रयत्न केला, पण भारताचा दिवसच नव्हता. विराट कोहलीच्या नेतृत्त्वात भारतीय संघाने साखळी सामन्यांमध्ये खूप उत्कृष्ट कामगिरी केली.

पुढील काळात हा संघ अधिक मेहनत घेऊन यापेक्षाही जास्त यश मिळवेल याची मला खात्री आहे. न्यूझीलंड संघाचे अभिनंदन आणि त्यांना पुढील सामन्यासाठी शुभेच्छा, असे विधान खन्ना यांनी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -