घरक्रीडाकिंग्ज संघाच्या विजयाचा 'हा' शिल्पकार शेंगदाणे विकायचा !

किंग्ज संघाच्या विजयाचा ‘हा’ शिल्पकार शेंगदाणे विकायचा !

Subscribe

दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असल्यामुळे आपल्या भावासह त्याने रस्यावर शेंगदाणे विकायला सुरुवात केली आणि तो आता आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरला आहे. हा क्रिकेटपटू दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी हा आहे. आयपीएलमध्ये उत्कृष्ठ कामगिरीमुळे नुकताच तो प्रकाश झोतात आला आहे. मात्र लहानपणी त्याने अगदी हालाकीचे जीवन व्यतीत केले.

– पाच सामन्यांमध्ये 9 बळी

- Advertisement -

एनगिडीला आयपीएलच्या लिलावात कुणी जास्त भाव देत नसल्यामुळे 50 लाख त्याची मूळ किंमत होती आणि हीच किंमत मोजत चेन्नईने त्याला आपल्या संघात सामील करून घेतले. भारताविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एनगिडीने पदार्पण केले होते. भारतात आता तो आयपीएल खेळत आहे. त्याची आयपीएलमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी झालेली आहे. त्याने आतापर्यंतच्या पाच सामन्यांमध्ये 9 बळी मिळवले आहेत. एनगिडी हा पंजाबविरुद्धच्या सामन्यात तर चेन्नईसाठी नायक ठरला होता. त्याने या सामन्यात धावांची टांकसाळ उघडलेल्या लोकेश राहुलला बाद केले, त्याचबरोबर तुफानी फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या ख्रिस गेलचा काटाही त्याने काढला. त्याने पंजाबचा कर्णधार आर. अश्विनला तंबूचा रस्ता दाखवला तर अ‍ॅण्ड्रयू टायलाही बाद केले. या चार फलंदाजांना बाद करत एनगिडीने पंजाबचे कंबरडे मोडले होते. आता बाद फेरीत त्याच्याकडून कशी कामगिरी होते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -