आयपीएलचे उर्वरित सामनेही भारतातच

Mumbai
IPL-Trophy

इंडियन प्रिमिअर लीगच्या (आयपीएल) १२ व्या मोसमाच्या पहिल्या दोन आठवड्यांचे वेळापत्रक काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आले होते. ही स्पर्धा २३ मार्चपासून सुरू होणार आहे. मात्र, उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक हे लोकसभा निवणुकांच्या तारखा लक्षात घेऊन बनवण्यात येणार होते. आता निवडणुकांची तारीख जाहीर झाल्यानंतर आयपीएलच्या उर्वरित साखळी सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. निवडणुकांमुळे यंदाची स्पर्धा देशाबाहेर खेळवण्यावर विचार सुरू होता, मात्र अखेरीस ही स्पर्धा देशातच खेळवण्यात येणार आहे.

या स्पर्धेतील पहिला सामना महेंद्रसिंग धोनीच्या गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज आणि विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. आधी जाहीर केलेल्या आयपीएलच्या वेळापत्रकानुसार पहिल्या दोन आठवड्यांत एकूण १७ सामने होणार आहेत. प्रत्येक संघ कमीतकमी ४ सामने खेळणार आहे, तर दिल्ली कपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे संघ प्रत्येकी ५ सामने खेळणार आहेत. दररोज संध्याकाळी एक सामना आणि शनिवार, रविवारी दुपार व संध्याकाळ असे दोन सामने होणार आहेत. संध्याकाळचे सामने ८ वाजता आणि दुपारचे ४ वाजता सुरू होणार आहेत.

पहिल्या २ आठवड्यांनंतरचे वेळापत्रक

*६ एप्रिल : चेन्नई वि. पंजाब, चेन्नई
   हैदराबाद वि. मुंबई, हैदराबाद
*७ एप्रिल : बंगळुरू वि. दिल्ली, बंगळुरू
  राजस्थान वि. कोलकाता, जयपूर
*८ एप्रिल : पंजाब वि. हैदराबाद, मोहाली
*९ एप्रिल : चेन्नई वि. कोलकाता, चेन्नई
*१० एप्रिल : मुंबई वि. पंजाब, मुंबई
*११ एप्रिल : राजस्थान वि. चेन्नई, जयपूर
*१२ एप्रिल : कोलकाता वि. दिल्ली, कोलकाता
*१३ एप्रिल : मुंबई वि. राजस्थान, मुंबई
  पंजाब वि. बंगळुरू, मोहाली
*१४ एप्रिल : कोलकाता वि. चेन्नई, कोलकाता
  हैदराबाद वि. दिल्ली, हैदराबाद
*१५ एप्रिल : मुंबई वि. बंगळुरू, मुंबई
*१६ एप्रिल : पंजाब वि. राजस्थान, मोहाली
*१७ एप्रिल : हैदराबाद वि. चेन्नई, हैदराबाद
*१८ एप्रिल : दिल्ली वि. मुंबई, दिल्ली
*१९ एप्रिल : कोलकाता वि. बंगळुरू, कोलकाता
*२० एप्रिल : राजस्थान वि. मुंबई, जयपूर
  दिल्ली वि. पंजाब, दिल्ली
*२१ एप्रिल : हैदराबाद वि. कोलकाता, हैदराबाद
  बंगळुरू वि. चेन्नई, बंगळुरू
*२२ एप्रिल : राजस्थान वि. दिल्ली, जयपूर
*२३ एप्रिल : चेन्नई वि. हैदराबाद, चेन्नई
*२४ एप्रिल : बंगळुरू वि. पंजाब, बंगळुरू
*२५ एप्रिल : कोलकाता वि. राजस्थान, कोलकाता
*२६ एप्रिल : चेन्नई वि. मुंबई, चेन्नई
*२७ एप्रिल : राजस्थान वि. हैदराबाद, जयपूर
*२८ एप्रिल : दिल्ली वि. बंगळुरू, दिल्ली
  कोलकाता वि. मुंबई, कोलकाता
*२९ एप्रिल : हैदराबाद वि. पंजाब, हैदराबाद
*३० एप्रिल : बंगळुरू वि. राजस्थान, बंगळुरू
*१ मे : चेन्नई वि. दिल्ली, चेन्नई
*२ मे : मुंबई वि. हैदराबाद, मुंबई
*३ मे : पंजाब वि. कोलकाता, मोहाली
*४ मे : दिल्ली वि. राजस्थान, दिल्ली
  बंगळुरू वि. हैदराबाद, बंगळुरू
*५ मे : पंजाब वि. चेन्नई, मोहाली
  मुंबई वि. कोलकाता, मुंबई

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here