घरक्रीडासंघहितासाठी कोणत्याही क्रमांकावर खेळण्याची तयारी हवी - श्रेयस अय्यर

संघहितासाठी कोणत्याही क्रमांकावर खेळण्याची तयारी हवी – श्रेयस अय्यर

Subscribe

भारतीय संघातील स्थानांसाठी खूप स्पर्धा असून संघहितासाठी प्रत्येक खेळाडूची कोणत्याही क्रमांकावर खेळण्याची तयारी हवी, असे विधान भारताचा युवा फलंदाज श्रेयस अय्यरने केले. मागील वर्षी झालेल्या विश्वचषकानंतर अय्यरचे भारतीय संघात पुनरागमन झाले. त्यानंतर त्याने चौथ्या क्रमांकावर खेळताना सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. मागील सहापैकी चार सामन्यांत त्याने अर्धशतके झळकावली आहेत.

मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल या तिन्ही सलामीवीरांना एकत्र खेळता यावे यासाठी संघ व्यवस्थापनाने कर्णधार विराट कोहलीला तिसर्‍याऐवजी चौथ्या आणि अय्यरला चौथ्याऐवजी पाचव्या क्रमांकावर खेळवण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा प्रयोग फारसा यशस्वी ठरला नाही.

- Advertisement -

सध्याच्या परिस्थितीत संघहितासाठी प्रत्येक खेळाडूची कोणत्याही क्रमांकावर खेळण्याची तयारी हवी. भारतीय संघातील स्थानांसाठी खूप स्पर्धा आहे. त्यामुळे प्रत्येकाची संघासाठी काहीही करण्याची तयारी असली पाहिजे. ठराविक क्रमांकावर फलंदाजी करता न आल्याने मला चांगली कामगिरी करण्यात अपयश आले, असे कारण कोणीही देता कामा नये. प्रत्येक खेळाडूला आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळावी यासाठी आम्ही काही प्रयोग करत आहोत. प्रत्येक फलंदाजाला लवकरच योग्य क्रमांक मिळेल, अशी मला आशा आहे, असे अय्यर म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -