घरक्रीडायुएफा युरो स्पर्धा २०२० ऐवजी २०२१ मध्ये होणार!

युएफा युरो स्पर्धा २०२० ऐवजी २०२१ मध्ये होणार!

Subscribe

नॉर्वेजियन, स्वीडिश एफएची माहिती

करोनाच्या पार्श्वभूमीवर युएफा युरो फुटबॉल स्पर्धा वर्षभर पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही स्पर्धा २०२० ऐवजी २०२१ साली होणार आहे. याबाबतची माहिती नॉर्वेजियन एफए आणि स्वीडिश एफए यांनी मंगळवारी दिली. युरो स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे, असे स्वीडिश एफएचे अध्यक्ष कार्ल-एरीक निल्सन म्हणाले. तर नॉर्वेजियन एफएने ही बातमी आपल्या अधिकृत अकाउंटवरुन ट्विट केली.

करोनाचा धोका लक्षात घेऊन जगभरातील अनेक स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. युरो स्पर्धा पुढे ढकलण्यासाठी युएफावर बर्‍याच दिवसांपासून दबाव होता. युएफा या युरोपियन फुटबॉलच्या नियामक मंडळाने मंगळवारी आपल्या ५५ सदस्य देशांसोबत, तसेच क्लब, लीग आणि खेळाडूंच्या प्रतिनिधींशी व्हिडीओ कॉन्फरन्सवरुन चर्चा केली.

- Advertisement -

युरो स्पर्धा पहिल्यांदाच पुढे ढकलली!
करोनामुळे इतर फुटबॉल स्पर्धांप्रमाणेच युरो स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. युरो स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्याची ही पहिलीच वेळ आहे. २४ संघांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेचे सामने अ‍ॅमस्टरडॅम, बाकू, बिल्बाओ, बुकारेस्ट, बुडापेस्ट, कोपनहेगन, डब्लिन, ग्लासगो, लंडन, म्युनिक, रोम आणि सेंट पीटर्सबर्ग येथे होणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -