घरक्रीडामहाराष्ट्राच्या दोन्ही संघांची विजयी सलामी

महाराष्ट्राच्या दोन्ही संघांची विजयी सलामी

Subscribe

ज्युनियर राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा

कोलकाता येथील नेताजी सुभाषचंद्र बोस क्रीडा संकुलात शुक्रवारपासून सुरू झालेल्या ज्युनियर राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुले आणि मुली या दोन्ही संघांनी विजयी सलामी दिली. महाराष्ट्राच्या मुलांनी झारखंडचा तर मुलींनी केरळचा पराभव केला.

‘क’ गटात समावेश असलेल्या महाराष्ट्राच्या मुलांनी झारखंडचा ५८-१६ असा धुव्वा उडवला. या सामन्याच्या मध्यंतराला महाराष्ट्राने ३३-७ अशी भक्कम आघाडी मिळवली होती. मध्यंतरानंतर मात्र महाराष्ट्राने थोडा सावध खेळ करत विजय मिळवला. सौरभ पाटील, शुभम शेळके, पंकज मोहिते यांच्या अप्रतिम चढाया आणि त्याला असलम इनामदार, वैभव गर्जे यांच्या पकडीची भक्कम साथ यामुळे महाराष्ट्राला सहज विजय शक्य झाला. महाराष्ट्रसह ‘क’ गटात झारखंड, हिमाचल प्रदेश हे दोन संघ आहेत.

- Advertisement -

महाराष्ट्राच्या मुलींनी केरळचा ३९-१५ असा पराभव करत आगेकूच केली. मध्यंतराला १७-०६ अशी आघाडी घेणार्‍या महाराष्ट्राने उत्तरार्धात आपल्या खेळाची गती वाढवत हा विजय मिळवला. प्रतीक्षा तांडेल, सोनाली हेळवी यांनी चढाईत तर साक्षी रहाटे, काजल खैरे, तेजा सपकाळ यांनी बचावात चमकदार खेळ केला. महाराष्ट्रासह मुलींच्या ‘ड’ गटात केरळ आणि ओडिसा या दोन संघांचा समावेश आहे.

मुलांच्या विभागात एकूण ३२, तर मुलींच्या विभागात २७ संघांनी सहभाग घेतला आहे. या दोन्ही गटातील सहभागी संघाची ८-८ गटात विभागणी केली असून, सामने प्रथम साखळी आणि नंतर बाद पद्धतीने खेळवले जातील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -