पाकिस्तानात आयपीएलचे प्रक्षेपण नाही

Mumbai
pakistan
प्रातिनिधिक फोटो

गेल्या काही वर्षांमध्ये बीसीसीआय आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डामध्ये द्वंद्व सुरु आहे. तसेच पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर आयपीएलप्रमाणेच असलेली स्पर्धा पाकिस्तान सुपर लीगच्या (पीएसएल) सामन्यांचे चॅनेलने भारतात प्रक्षेपण न करण्याचा निर्णय घेतला होता. आता जणू याची परतफेड करायची म्हणून पाकिस्तानने आयपीएलच्या बाराव्या मोसमाचे सामने पाकिस्तानात प्रसारित केले जाणार नाहीत, असा निर्णय पाकिस्तानचे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री फवाद अहमद चौधरी यांनी हा निर्णय घेतला आहे.

पाकिस्तान सुपर लीगदरम्यान भारतीय कंपन्या आणि सरकारने आम्हाला जी वागणूक दिली, ती पाहता पाकिस्तानमध्ये आयपीएलचे सामने दाखवले जाणार नाहीत.

आम्ही क्रिकेट आणि राजकारण या दोन गोष्टी वेगळ्या ठेवण्याचा सतत प्रयत्न केला. मात्र भारताने ‘आर्मी कॅप’ घालून सामना खेळला, ज्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. मला असे वाटते की पाकिस्तानमध्ये आयपीएलचे सामने दाखवले नाहीत तर त्यामुळे आयपीएल आणि भारतीय क्रिकेटचे नुकसान होईल, असे चौधरी म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here